महाराष्ट्र राज्यात ‘पाणलोट विकास घटक २.०’ योजना राबविण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री श्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत ‘पाणलोट विकास घटक २.०’ योजना राबवण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली आहे.panlot kshetra vikas 2.0
पाणलोट विकास योजना राबवण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाचे कृषी संबंधी सर्व पदाधिकारी सचिव संचालक हे उपस्थित होते.
‘पाणलोट विकास घटक २.०’ योजना काय आहे? पाणलोट योजना २०२२ सुरू |
‘पाणलोट विकास घटक २.०’ योजना उद्दिष्ट:-
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी पाणलोट विकास घटक २.०’ योजना ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच जमीन सुखी ठेवण्यासाठी मदत करणे जमिनीची धूप कमी करण्यास मदत करणे तसेच जमिनीची धूप होणे थांबवणे या बाबींकरिता कार्य करते. पाणलोट विकास घटक २.०’ योजना मध्ये केंद्र तसेच राज्य शासनाच्या निधीचा हिस्सा हा ६०:४० या प्रमाणात राहणार आहे.
हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन यादी जाहीर अशी करा डाऊनलोड
ही पाणलोट विकास योजना आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 30 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. Panlot Vikas Yojana अंतर्गत एकूण 144 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे. या पाणलोट विकास योजना अंतर्गत 5 वर्षांकरिता एकूण एक हजार तीनशे तेहत्तीस कोटी ५६ लाख रुपये इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. Panlot Vikas Yojana Maharashtra 2022, panlot Yojna, maharashtra sarkari Yojana, maharashtra government schemes
पाणलोट विकास 2.0 योजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या उपाय योजना:-
पाणलोट विकास योजना अंतर्गत आडवी पेरणी , मिश्र पीक पद्धती करणे मृतसरी काढणे, रुंद सरी – वरंबा पद्धतीने पेरणी करणे बांधबंदिस्ती, गॅबियन बंधारे इ. उपाय योजनांवर भर देण्यात येणार आहेत. पावसाचे व्यवस्थापन पाण्याची साठवण , पाण्याचा योग्य वापर व साठवणूक , पाण्याचे पुनर्भरण पाणलोट समिती हे कार्य करून घेणार आहेत. इत्यादी उपाय योजना वर भर हा देण्यात येणार आहेत. वरील सर्व बाबींमध्ये योग्य नियोजन व्यवस्थापन वर भर देण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:- बांधकाम कामगारांसाठी तीन नवीन योजना सुरू.
एकंदरीतच सिंचन क्षेत्राचा विकास करण्यासाठी उपाय योजना या योजने अंतर्गत करण्यात येणार आहे.