काय आहे लक्ष्मी मुक्ती योजना | Lakshmi Mukti Yojana Maharashtra

 

लक्ष्मी मुक्ती योजना Lakshmi Mukti Yojana Maharashtra या योजनेच्या  माध्यमातून शेतकरी बांधवांना जर त्यांची जमीन स्वखुशीने त्यांच्या पत्नीच्या नावाने करायची असेल तर लक्ष्मी मुक्ती योजना च्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या नावाची जमीन पत्नीच्या नावाने पती हयात असताना करू शकतात.

काय आहे लक्ष्मी मुक्ती योजना | Lakshmi Mukti Yojana Maharashtra
काय आहे लक्ष्मी मुक्ती योजना | Lakshmi Mukti Yojana Maharashtra

 

 

मित्रांनो जर एकाध्या महिलेला तिच्या पतीच्या नावाने असलेली जमीन तिच्या स्वताच्या नावाने करून पाहिजे असेल तर लक्ष्मी मुक्ती योजना च्या साहाय्याने ती तिच्या पतीच्या नावाने असलेली जमीन तिच्या स्वताच्या नावाने करून घेऊ शकते. जर महिलेच्या पतीला स्वखुशीने तो हयात असताना त्याच्या नावाने असलेल्या जमिनीवर तेच्या पत्नीला सह हिस्सेदारी मिळवून द्यायची असेल तर तो लक्ष्मी मुक्ती योजना च्या माध्यमातून त्याच्या जमिनीत तो हयात असताना त्याच्या पत्नीला हिस्सेदारी मिळवून देऊ शकतो.

हे सुध्दा वाचा:- पशू संवर्धन विभागामार्फत गाय म्हैस गट वाटप योजना सरू

तसेही महिलेला तिच्या पतीचे जर निधन झाले तर निधन झाल्यानंतर त्या महिलेला महाराष्ट्र महसुल अधिनियम 1966 नुसार वासरा हक्काने जमीन मिळते तिचे तिच्या पतीच्या सातबारा वर नाव हे आपोआप चढते. परंतु जर एकाध्यां शेतकऱ्याला स्वताच्या मर्जीने जमीन पत्नीच्या नावाने करायची असेल तर तो शेतकरी लक्ष्मी मुक्ती योजना च्या अंतर्गत जमीन नावाने करून देऊ शकतो.

 

परंतू जर महिलेला तिचा पती जिवंत असतानाच तिच्या नावावर तिला सह हिस्सेदारी पाहिजे असेल तर पतीच्या हयातीत  तिचे नाव पतीच्या सातबारा वर वडीलोपार्जित मालमत्तेत नमूद करण्यासाठी तरतूद ही करण्यात आलेली आहेत. ही तरतूद १५ सप्टेंबर १९९२ रोजी करण्यात आलेल्या महाराष्ट्र महसुल व वन विगागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.

 

महिलेच्या पतीच्या हयातीत तीचे नाव तीच्या पतीच्या जमिनीच्या 7/12  सातबारा  नाव लावण्याची तरतुद  लक्ष्मी मुक्ती योजना या योजने मध्ये करण्यात आलेली आहे.

 

एकाद्या शेतकऱ्याला स्वताच्या मर्जीने तिच्या पतीला तो हयात असताना वाटा मिळवून द्यायचा असेल तर तो शेतकरी त्याच्या पत्नीच्या नावाने जमीन करून देऊ शकतो. ही जमीन तो शेतकरी लक्ष्मी मुक्ती योजना च्या माध्यमातून त्याच्या पत्नीच्या नावाने जमीन संपत्ती करू शकतो. पतीच्या निधनानंतर  शेतकऱ्याच्या पत्नीला समाजामध्ये सन्मानाने जगता यावे या साठी ही lakshmi mukti yojana सुरू करण्यात आलेली आहेत. शेतकऱ्यांना आपल्या पत्नीच्या नावे जमिनीची मालकी करून देण्यासाठी एक चळवळ चालू करण्यात आलेली होती, ती चळवळ शरद जोशी यांनी चालवली होती. आणि त्या मध्येच शेतकऱ्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने जमीन करून देण्या संबंधी चा ठराव पारित करून लक्ष्मी मुक्ती योजना सफल करण्यात आली.

त्या वेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सुधाकरराव नाईक हे होते आणि त्या वेळेस त्यांनी या लक्ष्मी मुक्ती या चळवळीची दखल घेतली आणि लक्ष्मी मुक्ती या नावाने government gr मा. सुधाकरराव नाईक यांनी काढला होता.

हे नक्की वाचा:- सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज सुरू

 लक्ष्मी मुक्ती योजना अर्ज कसा करायचा:-

जर एकद्या शेतकऱ्याला स्वताच्या खुशीने त्याच्या पत्नीच्या नावाने जमीन करायची असेल तर त्याच्या पत्नीची नोंद सहहिस्सेदार म्हणून करायची असेल तर त्याने परिपत्रक च्या आधारे त्यांची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यानंतर शेतकऱ्याच्या पत्नीची नोंद ही फेरफार उताऱ्यात केली जाईल.

लक्ष्मी मुक्ती योजना च्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील महिलांना सन्मानाने जगता येणार आहे. नक्कीच ही योजना महिलांसाठी फायद्याची ठरणार आहे.

 

काही शंका असतील तर नक्की कमेंट करा

 

Leave a Comment