सिंचन विहीर योजना 2022 अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे | Sinchan Vihir Anudan Yojana

 मित्रांनो आजच्या या लेखा मध्ये आपण सिंचन विहीर अनुदान योजना 2022 विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, सिंचन विहीर अनुदान योजना साठी लागणारे कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पात्रता तसेच अर्ज कसा करावा या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.


सिंचन विहीर अनुदान योजना 2022 मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीर अनुदान योजना राबविण्यात येत असते. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी अनुदान देण्यात येत असते. आणि आता या योजनेनुसार आपल्या शेतात वैयक्तीक सिंचन विहिरींची कामे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या साठी दिनांक 4 मार्च 2021 च्या शासन निर्णयानुसार सिंचन विहीर वैयक्तिक कामासाठी मान्यता देण्यात आली आहे.(Sinchan Vihir Yojana Form download online)


सिंचन विहीर योजना अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे | Sinchan Vihir Anudan Yojana
सिंचन विहीर योजना अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे | Sinchan Vihir Anudan Yojana 


आपल्या महाराष्ट्र विहिरीच्या कार्यक्रमास अतिशय उत्कृष्ट प्रमाणात प्रतिसाद हे मिळत आहे. सिंचन विहीर योजना 2022(Sinchan Vihir Yojana 2022) ही एक शेतकरी बांधवांना संजीवनी देणारी महत्वपूर्ण अशी सरकारी योजना (Sarkai Yojana) आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी हे कोरडवाहू शेती करतात, म्हणजेच ही निसर्गाच्या भरवश्यावर शेती आहे. परंतु आता सध्याच्या परिस्थिती चा विचार करता निसर्गाच्या भरवश्यावर शेती करणे खूप कठीण आहे. पाऊस हा अनिश्चित झाला आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती ही सध्या धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या सिंचन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र (Sinchan Vihir Anudan Yojana Maharashtra) अश्या योजनांमुळे शेतकरी बांधवांना विहिरी उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी सिंचन विहीर योजना 2022(Sinchan Vihir Yojana 2022) अंतर्गत अर्ज करावा.


या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी या आधी अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत होता. परंतू आता त्या अटी व शर्ती मध्ये काही सुधारणा करण्यात आली आहे. त्या मुळे आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी सोयीस्कर होणार आहे.sarkari Yojana 2022, विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 


महात्मा गांधी राष्ट्रीय  रोजगार हमी योजने( विहीर अनुदान योजना महाराष्ट्र) अंतर्गत लाभ घेण्यासाठी सुधारित सूचना खालील प्रमाणे करण्यात आलेल्या आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत या पूर्वी लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी प्रक्रिया ही मोठी होती. परंतु आता विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार हा सहकार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना देण्यात आला. या साठी महाराष्ट्र शासनाने नवीन gr सुद्धा काढून मान्यता देण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा:- शेत पांदन रस्ते योजना 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत( Mahatma Gandhi rashtriya gramin rojgar hami yojana) लाभ घेण्यासाठी अटी व पात्रता:-

नवीन सिंचन विहीर योजना 2022

१) ‘Sinchan Vihir Anudan Yojana’ चा लाभ घेण्यासाठी लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे किमान ०.६० हेक्टर क्षेत्र सलग असावे. 

२) जी विहीर प्रस्तावित, जी विहीर तुम्हाला योजनेतून मिळाली आहे, ती विहीर आधीपासून अस्तित्वात असलेल्या इतर विहीरीपासुन ५०० फुटापेक्षा जास्त अंतरावर असावी लागते. तुम्ही योजने अंतर्गत जी विहीर बांधणार आहात, ती विहीर इतर विहिरी पासून 500 फूट अंतरा पेक्षा दूर असावी.

क) तुम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी(रोजगार हमी योजना - सिंचन विहीर)  योजने अंतर्गत( Mahatma Gandhi rashtriya gramin rojgar hami yojana) जी विहीर बांधणार आहात, ती विहीर ५ पोलच्या आंत विद्युत पुरवठा उपलब्ध असावा.

३)ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्या सातबारा वर विहीरीची नोंद नसावी.

४) ज्या व्यक्तीला लाभ घ्यायचा असेल त्या व्यक्तीकडे तलाठी यांच्या स्वाक्षरीचा एकूण क्षेत्राचा दाखला असावा. 

५) जर तुमच्या एकाच सातबाऱ्यावर जास्त लोकांची नावे असतील आणि तुम्हाला संयुक्त क्षेत्रावर विहीर योजना चा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे एकूण जमीनीचे क्षेत्र हे ०.६० हेक्टर पेक्षा जास्त व सलग असावे लागते.

६) या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असावे लागणार आहे. तरच तुम्हाला या Mahatma Gandhi rashtriya gramin rojgar hami yojana चा लाभ मिळू शकतो. तसेच ज्यांच्याकडे जॉब कार्ड असेल त्यांनी मजूर म्हणून काम करुन मजुरी घेणे आवश्यक आहे.

७) ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र जमा करावे लागते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार हा खालील प्रवर्गातील असावा:- 

 अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषि कर्जमाफी योजना २००८ नुसार अल्प भूधारक व सिमांत शेतकरी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती


 मनरेगा अंतर्गत विहिरी साठी अर्ज कसा करायचा (Vihir Yojana Maharashtra Application Form):-

मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुम्हाला विहीर योजना साठी करावयाचा अर्ज pdf स्वरूपात दिलेला आहे. तो अर्ज तुम्हाला download करुन. तो अर्ज व्यवस्थित भरून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तुमच्या तलाठी, ग्रामसेवक तसेच सरपंच यांच्या सह्या घेऊन तो अर्ज तुमच्या ग्राम पंचायत मध्ये जमा करावयाचा आहे. त्या नंतर तुम्हाला अर्ज प्राप्त झाल्याची पोहच पावती सुद्धा देण्यात येईल.

हे नक्की वाचा:-  अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर असे पहा तुमचे नाव

तसेच तुम्हाला आम्ही सिंचन विहीर वैयक्तिक अर्ज आणि सिंचन विहीर चा प्रस्ताव उपलब्ध करून दिलेला आहे.विहीर नोंदणी अर्ज 2022:-

सिंचन विहीर योजना अर्ज व प्रस्ताव डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.


विहीर नोंदणी अर्ज pdf:-


🛑सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज  – Download

🛑सिंचन विहीर अनुदान योजना प्रस्ताव – Downloadअश्या प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सिंचन विहीर योजना ही राबविण्यात येत आहे.शेतकरी मित्रांनो सिंचन विहीर योजना ( Sinchan Vihir Yojana) संदर्भातील ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.


अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.

Post a Comment

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने