राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी पावसाने उघडीप दिलेली होती तसेच राज्यात पडलेला पावसाचा खंड हा 21 दिवसापेक्षा जास्त काळ होता त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते शेती पिके करपून गेलेली होती व त्यामुळे अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना शेतकऱ्यांना काही प्रकारच्या सवलती देण्यात याव्या याकरिता राज्य शासना अंतर्गत निर्णय घेण्यात आलेला आहे.
राज्य शासना अंतर्गत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सवलती देण्यात येणार आहे तसेच राज्यांमध्ये एकूण 40 तालुके दुष्काळग्रस्त असून 1021 महसूल मंडळाचा दुष्काळात समावेश आहे. व अशाच तालुक्यांना व महसूल मंडळांना पुढील प्रमाणे सवलती राज्य शासना अंतर्गत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
राज्यातील दूष्काळग्रस्त भागांमध्ये देण्यात येणार असलेल्या सवलतीमुळे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येईल,33.5 टक्के सूट कृषी पंपाच्या चालू विज बिलामध्ये देण्यात येईल, दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली असल्यामुळे आवश्यक असलेल्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टॅंकरचा वापर करणे, पिक कर्जाचे पुनर्गठण, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, जमीन महसूल यामध्ये सूट देण्यात येईल, अशा प्रकारच्या सवलती राज्य शासना अंतर्गत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मदत होईल.