Rain Update: ऑगस्ट महिन्यात पावसाळा जोर कसा राहील? हा हवामानाचा अंदाज लक्षात घ्या

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये आतापर्यंत पावसाने हजेरी लावलेली होती, परंतु ऑगस्ट महिन्यातील पाऊस कसा राहील हा प्रश्न शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना पडलेला आहे? कारण अद्यापही काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी असल्याने सरासरी सुद्धा पावसाने गाठलेली नाही, तर काही भागांमध्ये सरासरीच्या वर पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या भागांमध्ये पावसाचा अभाव आहे अशा भागातील नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहे तर काही भागांमध्ये अतिवृष्टीला सुद्धा नागरिकांना सामोरे जावे लागलेले होते. व याच कारणाने ऑगस्ट महिन्यातील पाऊस कसा राहील हा प्रश्न सामान्यांना पडणे अपेक्षितच आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये 12 तारखेपर्यंत पाऊस विश्रांती घेणार आहे, परंतु असे काही भाग असतील की ज्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसासारखा पाऊस कोसळण्याची शक्यता सुद्धा टाळता येणार नाही, तसेच या पावसाचा अलर्ट वगैरे देण्यात येणार नाही कारण हा पाऊस अचानक आलेला असेल, काही भागात जर 12 तारखेच्या दरम्यान पाऊस आला तर त्या पावसाचा जोर खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे, एका दिवसामध्ये सुद्धा हा पाऊस सरासरी ओलांडू शकेल असा पाऊस पडेल.

12 तारखेपर्यंत जरी खंड असला तरी पुढे मात्र पाऊस येणार आहे, परंतु या काळामध्ये जर पावसाने दडी मारली तर सोयाबीन जे फुलावर आलेले असेल त्या पिकाला मात्र तडा बसण्याची शक्यता आहे, मराठवाड्यातील काही भागांमध्ये 25 जुलैपासून उघडलेला हा पाऊस यामध्ये साधारणतः 20 ऑगस्ट पर्यंतचा खंड पडण्याची शक्यता आहे.

तसेच राज्यामध्ये परतीचा पाऊस हा खूप जास्त प्रमाणात पडत असतो, व त्यामध्ये अलणींनो चा प्रभाव असल्यामुळे या पावसाचा जोर खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे, व हा पाऊस मराठवाडा खूप पश्चिम विदर्भ या भागात जास्त पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या अखेरचा आठवड्यात ऑक्टोंबर महिन्यामध्ये मान्सून परतीचा पाऊस व मानसून तसेच अननिनोचा प्रभाव यामुळे पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असणार आहे.

Rain Update: ऑगस्ट महिन्यात पावसाळा जोर कसा राहील? हा हवामानाचा अंदाज लक्षात घ्या

राज्यातील आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी खुशखबर, मिळणार दुपटीने मदत, एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Leave a Comment