Jatropha Farming Tips: शेतकऱ्यांनो या बायो डीझेल ची शेती करून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या या शेती बद्दल

आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाचे उत्पादन काढले जाते, परंतु तुम्ही ऐकलेले आहे का? डिझेलची शेती सुद्धा केली जाते, तर आपल्या देशातील राजस्थान,मध्यप्रदेश तसेच उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये डिझेलची शेती केली जाते, या शेतीमधून शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतात, या पिकाची लागवड कशा प्रकारे केली जाते यासंबंधी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत.

तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की डिझेल शेती म्हणजे नेमके काय? डिझेलची शेती म्हणजेच एक प्रकारचे जट्रोफा प्लांट आहे, याची लागवड करून त्या वनस्पतीच्या बियांपासून बायोडिझेल काढले जाते व यापासून शेतकरी चांगल्या प्रमाणात नफा मिळवू शकतात.

 

जट्रोफा चे लागवडी पासून ते काढणी पर्यंतची माहिती

जट्रोफाची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर केली जाऊ शकते, याची लागवड ही कोरड्या प्रकारच्या भागांमध्ये या केली जाते. तसेच रोपाची लागवड करताना पाच बाय 45 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर लागवड करावी लागते तसेच योग्य प्रकारे खताचे व्यवस्थापन सुद्धा या पिकाला करावे लागते. परंतु ही वनस्पती पाणी साचत असलेल्या भागांमध्ये येऊ शकत नाही. ज्यावेळेस या वनस्पतीला बिया येतात त्यावर प्रक्रिया करून, बीया फळांपासून वेगळ्या केल्या जातात, तसेच मशीन मध्ये टाकून यापासून तेल वेगळे केले जाते. तसेच लागवड करण्यासाठी भारत सरकार सुद्धा मदत करते, या पिकाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

Jatropha Farming Tips: शेतकऱ्यांनो या बायो डीझेल ची शेती करून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या या शेती बद्दल

राज्यातील आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी खुशखबर, मिळणार दुपटीने मदत, एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Leave a Comment