कृष्ण जन्माष्टमी (गोकुळाष्टमी) संपूर्ण माहिती मराठी | Krishna Janmashtami 2022 In Marathi

 

कृष्ण जन्माष्टमी (गोकुळाष्टमी) हा सण आपल्या संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात येत असतो. या गोकुळाष्टमी च्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा झाला होता. त्यामुळे हा कृष्ण जन्माष्टमी चा दिवस आपण मोठ्या आनंदात साजरा करीत असतो. ( Krishna Janmashtami 2022 In Marathi ) आजच्या या पोस्टमध्ये आपण कृष्ण जन्माष्टमी (गोकुळाष्टमी) विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. Krushn Janmashtami Information In Marathi

 

कृष्ण जन्माष्टमी (गोकुळाष्टमी) संपूर्ण माहिती मराठी | Krishna Janmashtami 2022 In Marathi
कृष्ण जन्माष्टमी (गोकुळाष्टमी) संपूर्ण माहिती मराठी | Krishna Janmashtami 2022 In Marathi

 

 

Table of Contents

 

आपण गोकुळाष्टमी या दिवशी संपूर्ण देशात दहीहंडी हा उत्सव साजरा करीत असतो. आपल्या महाराष्ट्र तर मोठ्या संख्येने दही हंडी च्या स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. कृष्ण जन्माष्टमी (गोकुळाष्टमी) हा सण आपण मोठ्या उत्साहात भगवान श्रीकृष्णाच्या(Krishna Janmashtami In Marathi) जन्मापासून साजरा करीत आहोत. भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत, जसे की कान्हा, गोपाल, केशव,गोविंद, बाल गोपाल. अनेक प्रकारचे कार्यक्रम सुद्धा या गोकुळाष्टमी. च्या दिवशी साजरे करण्यात येत असतात. कृष्ण जन्माष्टमी माहिती मराठी(Krushn Janmashtami mahiti Marathi)

 

 

प्रभु श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे अठरावे अवतार आहेत. प्रभु श्रीकृष्ण यांच्या जन्म दिवशी आपण मोठ्या उत्साहात व आनंदाने गोकुळाष्टमी हा सण साजरा करत असतो. भगवान श्री कृष्णाने पृथ्वी तलावावर धर्माचे रक्षण करण्यासाठी जन्म घेतला होता. तेही एक साधारण मनुष्य बनून. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे सृष्टीचे ब्रह्मांडनायक आहेत. भगवान श्री कृष्णाने त्यांच्या या रूपात अनेक भयानक राक्षसांचा पराभव आणि वध केला होता. श्रीकृष्ण हे सृष्टीचे पालनकर्ता आहेत. त्यांची अनेक रूपे आहे.

 

आपल्या भारत देशात हजारो वर्षांपासून ते आत्ता पर्यंत गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करत आहोत. या दिवशी भगवान श्री कृष्ण यांचा जन्म झाला असल्यामुळे आपण त्यांची पूजा करत असतो. आपल्या भारत देशातील प्रत्येक भागात श्री कृष्ण जयंती (गोकुळाष्टमी) साजरी करण्यात येत असते. ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाचे पूजन करून साजरी करण्यात येत असते. या गोकुळाष्टमी च्या दिवशी अनेक भागात भगवान श्री कृष्णाच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक घातला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांची भक्ती गीते सुद्धा गायली जात असतात.

 

 

कृष्ण जन्माष्टमी केव्हा साजरी करण्यात येत असते? (When is Krishna Janmashtami celebrated?) :-

 

श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी श्रावण महिन्यातील पौर्णिमे पासून आठ दिवसानंतर साजरी करण्यात येत असते. म्हणजेच गोकुळाष्टमी ही नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन पासून आठव्या दिवशी साजरी करण्यात येत असते.

 

 

कृष्णजन्माष्टमी 2022 कधी आहे? (When is Krishnajanmashtami in 2022 ?)

कृष्णजन्माष्टमी(Krishnajanmashtami) 2022 ही 18 ऑगस्ट 2022 या दिवशी आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी 2022 या दिवशी म्हणजेच 18 ऑगस्टला 8.42 सुरू होत असून 19 ऑगस्टला 8:59 पर्यंत गोकुळाष्टमी कालावधी असणार आहे.

 

 

कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी चे महत्व

भगवान श्रीकृष्ण (Krushn Janmashtami Information In Marathi) यांचा जन्म हा मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. आणि हा एक आनंदाचा क्षण आहे. म्हणून या गोकुळाष्टमी च्या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात येत असतो. या गोकुळाष्टमी च्या पवित्र दिवशी काही लोक व्रत सुद्धा करत असतात. या गोकुळाष्टमी च्या दिवशी कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत असते.

 

 

गोकुळाष्टमीच्या दिवशी(Krishna Janmashtami 2022 In Marathi) घरामध्ये चांगले पदार्थ जेवणासाठी करत असतात. देवाला नैवेद्य दाखवतात, गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात येत असतात. काल्याचा प्रसाद हा वितरित केल्या जातो. काला हा भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी,पोहे, ज्वारीच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही इत्यादी एकत्र करून बनविण्यात येत असतो. भगवान श्रीकृष्ण यांनी अष्टमीच्या दिवशी जन्म घेतला होता. त्यांनी मथुरेत जन्म घेतला होता. भगवान श्री कृष्णाने कंसाचा वध करण्यासाठी जन्म घेतला होता.

 

 

गोकुळाष्टमी साजरी कशी करतात

Krushn Janmashtami Information In Marathi आपल्या संपूर्ण भारत देशात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी करण्यात येत असते. गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे मंदिर सजवण्यात येते. भगवान श्रीकृष्णाचा मूर्तीला पाळण्यात ठेवण्यात येते. आणि झोके दिली जातात. गोकुळाष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सव मोठा आनंदाने साजरा करण्यात येत असतो. गोकुळाष्टमीच्या दिवशी उपवास धरण्यात येतो. गोविंदा आला असे म्हणत दहीहंडी फोडण्यात येते. आणि सर्वांना काला वाटण्यात येत असतो. Krushn Janmashtami mahiti marathi

 

 

श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा (Gokulashtmai Kataha Marathi)

भगवान श्रीकृष्ण(Shri Krishna) यांचा जन्म हा माता देवकी यांच्या पोटी झाला होता. त्यावेळेस मथुरेत कंसाचे राज्य होते. कंस हा जुलमी तसेच पापी होता. त्याने अनेक निष्पाप लोकांवर अत्याचार केला होता. त्याच्या पापाने संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झाली होती. एवढेच नाही तर त्याने त्याच्या बहीण देवकीला तुरुंगात टाकले होते. त्याच प्रमाणे कंसाने देवकीच्या पतीला सुद्धा तुरुंगात डांबून ठेवले होते. कंसाने देवकिच्या सात मुलांना मारून टाकले होते. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी आकाशा मधून आकाशवाणी झालेली होती, आणि त्या आकाशवाणी मध्ये देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे कंस हा देवकीच्या आठव्या पुत्राला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करीत होता. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी संपूर्ण जेलच्या पहारेकऱ्यांना बेशुद्ध झाली होती. त्यानंतर वासुदेव यांनी भगवान श्रीकृष्ण एका टोपलीमध्ये बसवून तुडुंब भरलेली यमुना नदी पार करून सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले होते. वासुदेव यांनी भगवान श्रीकृष्णाला यशोदा माता जवळ नेऊन ठेवले होते. आणि यशोदा माता यांची कन्या घेऊन ते परत आले होते. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचे पालन पोषण हे यशोदा माता यांनी केलेले आहे. भगवान श्रीकृष्ण यांना जन्म हा देवकी माता यांनी दिला आणि त्यांचे पालन पोषण यशोदा माता यांनी केले होते. अशाप्रकारे भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माची ही कथा आहे.

 

गोकुळाष्टमी विषयी माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा.

 

Leave a Comment