अटल पेन्शन योजना माहिती मराठी | Atal Pension Yojana Information In Marathi

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण अटल पेन्शन योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. जी आपल्या भारत देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन देत असते. उतरत्या वयात म्हणजे ६० वर्षा नंतर आपण काम करण्यास असक्षम असतो, अश्या वेळेस ही योजना पेन्शन देऊन आर्थिक आधार देण्याचे काम करते. ही योजना आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 ला सुरू केलेली आहे. या पोस्ट मध्ये आपण या योजने साठी अर्ज कसा करायचा? अटी व शर्ती तसेच पात्रता या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Atal pension Yojana mahiti marathi

अटल पेन्शन योजना माहिती मराठी | Atal Pension Yojana Information In Marathi
अटल पेन्शन योजना माहिती मराठी | Atal Pension Yojana Information In Marathi

 

आपल्या देशातील केंद्र सरकारच्या वतीने ही योजना असंघटित क्षेत्रासाठी लागू केली आहे. ही योजना एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. जी आपल्याला वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य पुरविते. सुरुवातीला या योजने अंतर्गत लाभार्थी जेवढी रक्कम या योजनेत भरत होता, तेवढीच रक्कम हे केंद्र शासन भरत होते, परंतु या योजनेला खूप जास्त प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे एवढी रक्कम सरकार भरू शकत नसल्याने आता केंद्र सरकारने आपला सहभाग बंद केला. या atal pention scheme मध्ये जेव्हा ही योजना सुरू झालती तेव्हा ईपीएफ खाते असणाऱ्या व्यक्तींना तसेच कर भरणाऱ्या व्यक्तींना लाभ घेता येत नव्हता परंतु आता ही अट काढून टाकल्यामुळे यांना सुद्धा लाभ घेता येणार आहे.

या अटल पेन्शन योजना वर पीएफआरडीएचे नियंत्रण आहे. तुम्हाला या योजने मध्ये ६० वर्ष नंतर जेवढी रक्कम पाहिजे असेल त्या नुसार तुम्हाला प्लान निवडावा लागतो. या योजने मध्ये तुमचे वय आणि तुम्हाला पाहिजे असलेली पेन्शन या नुसार भरायचा premium चा chart आहे त्या नुसार premium निवडून घ्यावा.


हे सुद्धा वाचा:- जमीन खरेदी करण्यासाठी १००% अनुदान योजना सुरू

 

या योजने मध्ये सहभागी कसे व्हाल ? How to participate in Atal Pension Scheme? :-

 

Atal Pension Yojana मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याकडे बँक अकाऊंट असले पाहिजे. अटल पेन्शन योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी वय हे १८ ते ४० च्या दरम्यान असावे लागते. अटल पेन्शन योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तीला अटल पेन्शन योजना अंतर्गत अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे मोबाईल नंबर असावा लागतो. या atal pention scheme अंतर्गत लाभ हा आपण कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँका तसेच काही प्रायव्हेट बँका आणि पोस्ट ऑफिस मध्ये अटल पेन्शन खाते उघडून करू शकतो. या बँक खात्यासाठी नॉमिनेशन आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला ६० वर्षानंतर किती पेन्शन हवी, ते ठरवायचे आहे. त्यानुसार तुम्हाला रक्कम ही जमा करावी लागते. जर तुम्हाला ६० वर्ष नंतर जास्त पेन्शन पाहिजे असेल तर रक्कम ही जास्त भरावी लागते. ही रक्कम आपल्या बँक अकाऊंट मधून कपात करण्यात येत असते. जर आधी तुम्ही जास्त रकमेचा प्लान निवडा असेल आणि नंतर तुम्हाला जास्त रक्कम जमा करणे शक्य नसल्यास तुम्ही तुमचा प्लान चेंज करून घेऊ शकतात. जर तुम्हाला पहिल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम भरायची असल्यास त्याची सुद्धा सुविधा आहे. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन या संबंधित फॉर्म भरून बदल करू शकतात. यासाठी बँक तुम्हाला स्मॉल चार्ज आकारू शकते.

 

अटल पेन्शन योजना मधून रक्कम काढण्याच्या अटी:-

या अटल पेन्शन योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या म्हणजेच लाभदायक असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या पती किंवा पत्नीला पेन्शन मिळत असते. जर त्यांच्या पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्यास तर नॉमिनी ला रक्कम मिळते. अटल पेन्शन योजना मध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तीस गंभीर आजार झाल्यास रक्कम काढता येते. आपण या योजने अंतर्गत नॉमिनी ला किती प्रमाणात रक्कम काढता येईल याची सुद्धा माहिती देऊ शकतो. अटल पेंशन योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1800-110-069 यावर संपर्क करू शकता.atal pension scheme information in Marathi

 

अटल पेंशन योजना अर्ज प्रक्रिया ( Atal Pension Scheme Application Process ) :-

अटल पेंशन योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करू शकतात. अर्ज ऑनलाईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html

 

अटल पेंशन योजना अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी atal pention yojna वर क्लिक करा. आता APY Subscriber Registration Form‘ डाऊनलोड करून त्यांची प्रिंट घ्यावी.  आता फॉर्म सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जसे, आधार कार्ड, मतदान  कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, असे कागदपत्रे घेऊन बँकेत जायचे आहे. तेव्हा तुम्हाला तिथे अटल पेन्शन विषयी संपूर्ण माहिती provide करून तुम्हाला ते ओपन करून देण्यात येईल.

हे नक्की वाचा:- किसान मानधन योजना शेतकरी बांधवांना मिळणार ३००० रुपये मासिक मानधन

अश्या पद्धतीने केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेली ही एक महत्वपूर्ण अशी असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना पेन्शन पुरविणारी एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. आणि अशाच महत्वपूर्ण योजना विषयी माहिती वेळेवर जाणून घेण्यासाठी या वेबसाईट ला भेट देत चला.

Leave a Comment