‘कृषी कर्ज मित्र’ योजना काय आहे? अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती | krishi karj mitra yojana

 

आजच्या या लेखामध्ये आपण ‘कृषी कर्ज मित्र’ योजना काय आहे? अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती krishi karj mitra yojana या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्या शेतकरी बांधवांना शेती करत असताना विविध बाबींसाठी खर्च येत असतो, त्यामुळे त्यांना कर्जाची आवश्यकता असते. अशा वेळेस कोणताही शेतकरी सावकारी पाशात बळी पडू नये म्हणून शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांना बिनव्याजी कर्ज हे देण्यात येत असते. आणि हे कर्ज शेतकरी बांधवांना सहज व सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी कर्ज मित्र योजना ही सुरू केली आहे.

 

‘कृषी कर्ज मित्र’ योजना काय आहे? अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती | krishi karj mitra yojana
‘कृषी कर्ज मित्र’ योजना काय आहे? अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती | krishi karj mitra yojana

 

शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांना बिनव्याजी कर्ज हे देण्यात येत असले तरी सुद्धा, शेतकरी बांधवांना ते कर्ज मिळवता येत नाही याचे कारण म्हणजे कर्ज मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे जसे की नो ड्यूस प्रमाणपत्र, स्टॅम्प आणि आणखीन ही बरीच कागदपत्रे आहेत जी दिलेल्या मुदतीत जमा न केल्यास शेतकरी पीक कर्ज मिळवू शकत नाही. त्यामुळे ते खाजगी लोकांकडून कर्ज घेण्यास भाग पाडतात. व असे केल्यास खाजगी कर्जदारांना त्यांना जास्त दराने व्याज द्यावे लागते. त्यामुळे शेतकरी आणखीन खचून जातो. या सर्व बाबी पासून शेतकऱ्यांची मुक्तता होण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली आहे.

 

हे सुद्धा वाचा:- शेतकरी गट नोंदणी कशी करायची? 

 

शेतकरी बांधव पीक कर्ज हे राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका यांच्याकडून घेत असतात. यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे ही किचकट असल्यामुळे कृषी कर्ज मित्र योजना ही शेतकरी बांधवांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत.

 

कृषी मित्र योजना अंतर्गत कर्ज घेल्यास शेतकऱ्यांना काही शुल्क द्यावे लागणार आहेत ते कर्जनुसार असेल जसे की अल्प मुदती कर्ज असल्यास 150 रुपये, दीर्घ मुदतीचा 250, नुतनीकरण कर्ज असल्यास 200 इतके शुल्क द्यावे लागणार आहे.

 

हे नक्की वाचा:- प्रधानमंत्री आवास योजना २०२२ ची नवीन यादी जाहीर

 

“कृषी कर्ज मित्र योजना” सहभागी कसे व्हावे :-

ज्या व्यक्तींना कृषी कर्ज मित्र योजना मध्ये सहभागी होऊन सेवा द्यायची असेल त्यांनी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार आहेत.

 

कृषी कर्ज मित्र योजना अंतर्गत कृषी कर्ज मित्रास करावयाची कार्यवाही:-

कृषी कर्ज मित्राने शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे गोळा करावी लागेल त्यानंतर शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण हे तयार करावे लागेल त्यानंतर शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे व कर्ज प्रकरण हे मंजुरी साठी बँकेकडे सादर करावे लागेल.

 

शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळवून देण्यासाठी सल्ला देणे व साहाय्य करणे हे कृषी कर्ज मित्रास करावे लागेल.

हे नक्की वाचा:- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे?

कृषी कर्ज मित्र योजना ही वर्ष २०२१- २२ मध्ये राबविण्यात येणार आहे. तसेच ही योजना मंजूर झालेली असून १० लाख रुपये इतका निधी ही योजना राबविण्यासाठी मंजूर केला आहे.

 

Leave a Comment