अल्पसंख्यांक वसतिगृह योजना मिळणार ३५०० महिना | alpsankhyank hostel yojana

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे, ज्या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यामध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना या अल्पसंख्यांक वसतिगृह योजना(alpsankhyank hostel yojana) आहाराकरिता ३५०० रुपये मिळणार आहे. alpsankhyak hostel yojana

अल्पसंख्यांक वसतिगृह योजना मिळणार ३५०० महिना | alpsankhyank hostel yojana

 

 

अल्प संख्यांक विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आपल्या राज्यात अल्पसंख्यांक विभागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह हे उघडण्यात आलेले आहेत. अल्पसंख्यांक समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. त्यामुळे या अल्पसंख्यांक वसतिगृह हे उघडण्यात आले आहे आणि या योजने अंतर्गत या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना आता भोजन खर्चासाठी पैसे मिळणार आहे. आणि हे पैसे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या संबंधी शासन निर्णय घेतला आहे. आणि या योजने ची सुरुवात वर्ष २०२१-२२ पासूनच सुरु करण्यात येत आहेत.alpsankhyank hostel yojana

हे सुध्दा वाचा:- स्वधार स्कॉलरशिप योजना अर्ज सुरू

 

अल्पसंख्यांक वसतिगृह आहार योजना :-

 

या घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार जे विद्यार्थी अल्पसंख्यांक विभागाच्या विभाग स्तरीय शासकीय वसतिगृहात राहतात, अशा विद्यार्थ्याना ३५०० रुपये प्रत्येक  महिन्याला आहार करण्यासाठी देण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरावरील शासकीय वसतिगृहात राहतात, अशा विद्यार्थ्याना प्रत्येक महिन्याला ३००० रुपये इतकी रक्कम देण्यात येत असते. आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, ज्यू व पारशी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना या अल्पसंख्यांक वसतिगृह योजना चा लाभ हा मिळणार आहे.

 

 

अल्पसंख्यांक हॉस्टेल योजना पात्रतेच्या अटी :-

मित्रानो अल्पसंख्यांक वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना या  योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता ह्या ठेवून देण्यात आलेल्या आहेत. त्या खालील प्रमाणे आहेत. वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे राष्ट्रीयकृत बँकेत बँक खाते असणे आवश्यक आहे. आणि ते बँक खाते हे तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असले पाहिजे. alpsankhyank hostel yojana

हे नक्की वाचा:- दहावी झालेल्या विद्यार्थ्याना फ्री टॅबलेट योजना

या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी थेट रक्कम ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहेत. व रक्कम ट्रान्स्फर केल्याची लाभार्थ्यांची यादी ही प्राचार्यांना पाठविण्यात येईल.

 

1 thought on “अल्पसंख्यांक वसतिगृह योजना मिळणार ३५०० महिना | alpsankhyank hostel yojana”

  1. अल्पसंख्यांक hostel अर्ज कसा करायचा माहिती द्या सर

    Reply

Leave a Comment