15 ऑगस्ट 2022 माहिती– Swatantrata Diwas Mahiti – Independence Day Information in Marathi

15 ऑगस्ट, हा दिवस भारतातील प्रत्येक व्यक्तींसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा दिवस आहे. कारण या दिवशी आपण इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झालो होतो.म्हणजेच आपण 15 augast 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला होता. आणि आपण आपल्या देशाचा कारभार आपल्या हाती घेऊन या भारत देशामध्ये लोकशाही व्यवस्था निर्माण केली होती. स्वतंत्र मिळविण्यासाठी (15 ऑगस्ट करिता) आपल्या देशातील अनेक महान लोकांनी बलिदान दिले होते. 15 august mahiti marathi अनेक जणांनी या भारत देशाला  गरज मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा दिली होती. विर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महान व्यक्तींनी आपल्या देशासाठी स्वताच्या प्राणाची आहुती दिली. 15 ऑगस्ट 2022 माहिती.  गांधी जी सारख्या महान लोकांनी सत्याग्रह तसेच अनेक चळवळी करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणून आपल्या प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस महत्वपूर्ण आहे. या दिवशी सर्वजण ध्वजारोहण करतात.  भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे जातात आणि तिथून तिरंगा झेंडा  रोवून हा दिवस साजरा करतात.  15 August 2022 information Marathi

15 ऑगस्ट माहिती 2021– Swatantrata Diwas Mahiti – Independence Day Information in Marathi
15 ऑगस्ट माहिती 2021– Swatantrata Diwas  Mahiti – Independence Day Information in Marathi


हे नक्की वाचा:- २६ जानेवारी २०२२ माहिती, इतिहास महत्व

मित्रानो १५ ऑगस्ट १९४७ साली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीशांच्या(इंग्रजांच्या)  पासून भारत देश मुक्त झाला.आणि त्याच दिवसापासून भारत देश एक स्वतंत्र देश म्हणून नव्याने ओळखला जाऊ लागला. भारत देशाला नवीन ओळख मिळाली. आपण जवळपास 150 वर्षे. इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो आणि आपण अत्यंत यातना आणि हालअपेष्टा सहन केल्या. या जुलमी इंग्रजांनी आपल्या भारत देशातील कित्येकांना निर्दोष लोकांना फाशी ची शिक्षा दिली. तर कित्येकाना तुरुंगवास भोगावा लागला. अनेक काळया कायद्या द्वारे त्यांनी आपल्या लोकांना देशद्रोह या गुन्हा मध्ये अडकवले. आपण १८५७ या वर्षापासून ब्रिटीश राजवटी विरुद्ध( इंग्रजांविरुद्ध)  युद्ध करीत होतो. लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर कित्येक लोकांचे संसार हे उध्वस्त झालेत. या सर्व लोकांच्या बलिदानामुळे आपण आज हा सुवर्ण दिवस पाहत आहोत. आपला तिरंगा झेंडा आज अभिमानाने फडकू लागला. आणि त्या दिवसाची आठवण म्हणून आपण हा Independence Day साजरा करतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण लोकशाही पद्धती अमलात आणली. आणि आपले संघराज्य निर्माण झाले .त्या पद्धती मध्ये आपल्या लोकांनी निवडलेले प्रतिनिधी हे कारभार करणार होते. आता या भारत देशामध्ये कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा! ही व्यवस्था आपल्या देशा मध्ये निर्माण झाली होती. हे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाची घटना देशासाठी लीहली व सर्वांना समान हक्क प्रधान केला. त्यासाठी त्यांनी अनेक देशांच्या घटनेचा आधार घेतला व देशाला एक घटना लिहून दिली आणि त्या घटनेच्या आधारावर सध्या आपला देश चालत आहे. 75 independence day of India, 15 August Independence Day speech

 

 

Independence Day स्वातंत्र्य दिवस कसा साजरा केला जातो:-  15 august 2022

आपल्या देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवतात. त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री आणि देशातील तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर जातात आणि महात्मा गांधी तसेच इतर थोर  नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात. आणि त्या नंतर जे प्रमुख पावणे असतील त्यांच्या सोबत कार्यक्रमाला जातात. आणि या सुवर्ण दिवशी म्हणजेच 15 augast 1947 रोजी देशातील सर्व शाळांमध्ये व कॉलेजामध्ये नाच गाणी तसेच मनोरंजनाचे व भाषणाचे कार्यक्रम हे होत असतात. आणि त्या दिवसी लहान लहान मुलं ध्वज घेऊन फिरतात. अनेक ठिकाणी प्रभात फेऱ्या काढल्या जातात. गोड धोड वाटण्यात येते. सगळी कडे झेंडा वंदनाचे कार्यक्रम होतात. भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र देशांचे स्वतंत्र नागरिक म्हणून वावरताना खूपच अभिमान वाटत असतो. १५ ऑगस्ट या दिवशी भारत सरकार अनेक जे लोक जे पुरस्काराचे मानकरी आहेत अशा व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत असती. अश्या पद्धतीने हा स्वतंत्र दिवस साजरा करत असताना आपल्याला लोकशाही बद्दल सुध्दा अभिमान वाटतो.15 ऑगस्ट,15 ऑगस्ट मराठी भाषण,15 august independence day speech in marathi,15 august speech in marathi,15 august essay in marathi. 

 

 

 

स्वतंत्रता दिवस माहिती मराठी(Independence Day Information in Marathi)

मित्रानो आपल्या प्रिय भारत देशाला ब्रिटिश सरकारच्या राज वटीतून १५ ऑगष्ट१९४७ ला संपूर्ण स्वतंत्र मिळाले. येणाऱ्या आपल्या सर्वच पिढीतल्या लोकांसाठी १५ ऑगस्ट १९४७ हे वर्ष म्हणजे एक ऐतिहासिक असे वर्ष म्हणून ओळखण्यात येईल. आणि या महत्वपूर्ण अशा पवित्र दिवसाच्याया आठवणी  आपण  आपल्या हृदयात कायम ठेवल्याच पाहिजेत. आणि त्याच उद्देशाने आपण दरवर्षी या सुवर्ण दिवसाला 15 augast ला “स्वातंत्र्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. भारतातील प्रत्येक नागरिकाला 15 augast हा दिवस Independence Day म्हणून साजरे करण्यात येते. आणि  हे स्वतंत्र मिळविण्यासाठी संपूर्ण भारत देशातून अनेक क्रांतिकारकांनी केलेले आपले योगदान आपल्याला माहीत असले पाहिजे. त्यांनी दिलेल्या योगदाना मध्ये प्रयेक क्रांतिकारकांचे मार्ग हे  वेगवेगळे जरी होते तरी सुध्दा त्या मागचे ध्येय हे सर्वांचे एकच होते. ते ध्येय म्हणजे भारताचे स्वातंत्र्य! इंग्रजांनी आपल्या भारत देशावर सुमारे दीडशे(150) वर्षे राज्य केले आणि आपल्या देशातील सर्व संपत्तीची वाटोळं करून सोडलं. ब्रिटिशांनी आपला ईतिहास, पराक्रम, स्वाभिमान नष्ट करून त्यांनी आपल्या देशातील जनतेला फार त्रास देऊन त्याचे हाल केले. आणि त्यांच्या ब्रिटिश काळात त्यांनी आपल्या भारतात शिक्षणाचा नुसता देखावा निर्माण केला आणि आपल्या भारतीय तरुंनाना नोकरी मध्ये सर्वात खालच्या दर्जाची नोकरी मिळेल इतक्या पुरतेच आपले शिक्षण त्यांनी मर्यादीत करून आपले फार खराब हाल केले होते. ते फक्त कारकून बनतील इतकीच आपल्या भारतीय जनतेला शिक्षणाची मर्यादा होती. सुरुवातीला फक्त व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेले इंग्रज आपल्यावरच राज्य करत होते. त्यांनी भारतीय जनतेची खूप मोठ्या  प्रमाणात पिळवणूक केली होती. त्यांनी आपल्या भारतीय शेतकरी बांधवांना कापडाचे लालच देऊन आपल्या देशातील शेतकर्यांना फार मोठ्या प्रमाणात लुबाडले. त्यांना इतर देशामध्ये चहा चे निर्यात करण्यासाठी तसेच चहाच्या मळ्यांची भरभराट साधण्यासाठी त्यांनी भारतीयांना चहा चे उत्पादन घेण्यास सक्ती केली. अशा प्रकारे इंग्रजांनी भारतीयांना अनेक प्रकारे लुबाडले.15 august speech in marathi,१५ ऑगस्ट २०२२, 15 August 2022 information Marathi

 

15 ऑगस्ट माहिती 2022– Swatantrata Diwas Mahiti – Independence Day Information in Marathi
15 ऑगस्ट माहिती 2022– Swatantrata Diwas  Mahiti – Independence Day Information in Marathi

 

आणि त्यामुळेच इंग्रजांच्या अशा जुलमी धोरणामुळे इंग्रजाविरुद्ध अनेक क्रांतिकारी संघटना उभ्या राहिल्या. अनेकांनी शांतीच्या मार्गाने तर अनेकांनी शस्त्र उचलून इंग्रजांविरुध्द बंड पुकारले होते. अनेक लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वर्ष १८५७ रोजी झालेल्या उठावामध्ये अनेक क्रांतिकारकांनी आपला निषेध नोंदविला होता. त्यामध्ये तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई,नाना साहेब पेशवे यांनी हा 1857 चा उठाव पेटवून धरला होता. त्यानंतर अनेक क्रांतिकारकांनी  सशस्त्र उठाव केला त्यामध्ये वासुदेव बलवंत फडके, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू  इत्यादी क्रांतिकारकांनी आपला निषेध नोंदविला होता. काही जणांनी इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली. भारतीय माणूस स्वतंत्र मिळविण्यासाठी पेटून उठला पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली. अनेक जणांनी आपली वृत्तपत्रे सुरू करून भारतीय लोकांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. अशे अनेक प्रयत्ने  झाली, पण ती दडपली सुध्दा गेली. न्या रानडे, टिळक, गोपाळ कृष्ण गोखले,आगरकर यांनी आपल्या  लेखणी आणि आपल्या भाषण वाणीतून इंग्रजांकडून होणारा अन्याय इंग्रजांकडून होणारा जुलूम यांची जनतेला जाणीव करून देण्याचे कार्य त्यांनी केले. 15 augast bhashan marathi, essay on independence day in marathi, १५ ऑगस्ट २०२१. १५ ऑगस्ट या दिवशी आपण ज्या प्रमाणे आपल्या क्रांतिकारकांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याच प्रमाणे इतर दिवशी सुद्धा आपण आपल्या क्रांतिकारकांचा सन्मान केला पाहिजे. हे आपले भारताचा नागरिक म्हणून कर्तव्य आहे. या वर्षी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आज आपल्याला इंग्रजांच्या जुलमी सत्तेपासून मुक्त होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्व नागरिकांसाठी महत्वाचा दिवस आहे. कारण की हाच दिवस पाहण्यासाठी आपल्या देशातील अनेक वीरांनी आपले बलिदान दिले होते.

 

 

 

हे नक्की वाचा:- बैल पोळा 2022 माहिती मराठी

 

 

इंग्रजांनी फोडा व राज्य करा. या धोरणाचा अवलंब केला होता.आणि त्यातूनच इंग्रज आपल्या भारतीय लोकांमध्ये आप आपसमध्ये भांडणे लावून देली. व आपल्या वरच अन्याय करून राज्य करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आता आपल्या भारतीय लोकांना एकत्र येण्याची गरज ही वाटू लागली होती. महात्मा ज्योतिबा फुले इ. च्या शिकवणीने जाती भाव दूर करण्यास मदत झाली जाती भावामुळे समाज कसा दुर्बल होतो हे त्यांनी लोकांना  शिकले. त्यांनी अनेक ग्रंथ लिहले. अनेक क्रांतीकारकानी देशासाठी फासावर जाऊन स्वतःचे बलिदान दिले. टिळकांनी, सावरकरांनी आणि गांधीजी यांनी अनेक वेळा अशा  तुरुंगवास  भोगला होता. परंतु फोडा आणि राज्य हे त्यांनी त्यांची ब्रिटिश सत्ता कायम ठेवण्यासाठी वापरलेले षडयंत्र होते. त्यामुळे इंग्रज आपल्या भारतीय लोकांमध्ये फूट पाडत होते. महात्मा गांधी जी यांनी  सत्याग्रहाच्या व अहिन्स्तेच्या मार्गाने जाण्याचा संदेश त्यांनी जनतेला दिला. त्यांनी अणेक ठिकाणी शांततेच्या मार्गाने लढा चालू ठेवला. असहकार चळवळीच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटीश सरकार ला सहकार्य न करण्याचे ठरवले. प्रति सरकारे स्थापन झाले. बाबू गेणू यांनी स्वताच्या अंगावरून ट्रक जाऊ दिला परंतु मागे हटले नाही. महात्मा गांधी जी यांनी ब्रिटिश काळातील असलेले सरकारी व जुलमी प्रकारचे कायदे, देशातील जनतेवर होणारा अन्याय, भारतीय नागरिकांना सरकारी नोकरी मधील उच्च पदा मध्ये नसलेले स्थान या विरुद्धसत्याग्रहाची मोहीम सुरु केली. गांधीजींना त्यांच्या या देशहित च्या कार्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इत्यादी चे सहकार्य हे लाभले होते. त्यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी मोठ्या धाडसाने इंग्रजांच्या धोरणाला विरोध करण्यासाठी “आझाद हिंद सेना” नावाची फौज उभी केली. त्यावेळेस इंग्रजां विरुद्ध लढा देण्यासाठी जहाल व मवाळ गट निर्माण झाले. प्रत्येक भारतीयानी आप आपल्या पद्धतीने लढा दिला. अनेक ठिकाणी प्रती सरकारे स्थापन करण्यात आली. भारत छोडो, do or die या सारख्या गांधीजींच्या अनेक प्रयत्नामुळे ब्रिटिश सरकार ला स्वतंत्र देण्यासाठी मजबूर केले होते. शेवटी 15 august 1947 रोजी ब्रिटिश सरकारच्या जुलमी सत्तेतून आपण मुक्त झालो. आणि आपण लोकशाही पद्धतीने जगत आहोत. १५ ऑगस्ट माहिती मराठी

हे सुध्दा वाचा:- माहितीच्या अधिकारा अंतर्गत अर्ज कसा करायचा

तर मित्रानो अशा पद्धतीने अनेकांनी  वेग वेगळ्या मार्गाने व अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य आपण मिळविले आहे. आपल्या पूर्वजांनी स्वतंत्र मिळवले म्हणून आपण आणि आपली पिढी या लोकशाही असलेल्या सर्वांना समान हक्क असलेल्या देशामध्ये जगत आहोत. त्यामुळे  आता आपल्याला मिळालेले भारताचे स्वातंत्र्य टिकविण्याचे काम हे आपल्याला करायचे आहे आणि आपण हे काम केलेच पाहिजे! आणि म्हणूनच आपण आपल्या देशाला मिळालेल्या स्वतंत्र दिवस कायमचा लक्षात ठेवण्यासाठी १५ ऑगष्ट हा दिवस आपण पवित्र सण समजून साजरा केला पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येक लोकांचा वेगवेगळा सण असला तरी सुधा १५ ऑगस्ट(Independence Day) हा दिवस सर्व भारतीयांनी सर्वांचा भारतीय सण म्हणून साजरा केला पाहिजे. कारण 15 augast हा दिवस सर्वच भारतीयांसाठी गर्वाचा दिवस आहे. आजच्या या पवित्र दिवशी आपण  चांगले निश्चय केले पाहिजे, तसेच देश हिताचे काम करायची शपथ सुधा आपण घेतली पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये देशा साठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा ही आपली असली पाहिजे. भारताला या दिवशी स्वतंत्र मिळाले त्या दिवशी ज्या लोकांनी देश स्वतंत्र होण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा लोकांना नेहमी स्मरणात ठेवले पाहिजे.  Independence Day Information in Marathi

१५ ऑगस्ट २०२१,15 august 2021,15 august quotes,15 ऑगस्ट भाषण, 15 august speech in marathi,15 augast bhashan marathi, essay on independence day in marathi

 

 

15 ऑगस्ट या दिवसी आपला भारत देश स्वतंत्र झाला.   वर्ष 1947 साली आपली पवित्र भारतभूमी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाली. भारताच्या स्वातंत्र्याला अनेक वर्षे उलटून जात आहेत. त्यामुळे आपल्याला   स्वातंत्र्याचा जो खरा अर्थ  आहे तो कळला पाहिजे. आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकांसाठी 15 august आणि 26 January हे दोन दिवस महत्वाचे व नॅशनल फेस्टिवल आहेत. आपला भारत  देश आज एक प्रबळ प्रजासत्ताक म्हणून संपूर्ण विश्र्वामध्ये भरभराटीने आपली वाटचाल ही करत आहे. आपला देश हळू हळू विकसनशील देशांमधून विकसित देश यांच्या यादी मध्ये आपले नाव नोंदवित आहे. आपल्या देशाची स्वतःची राज्य घटना आहे. परंतु आपल्याला ज्या क्रांतिकारकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा लोकांचा विसर पडल्याचे कुठे तरी दिसून येत आहे. केवळ 15 ऑगस्ट च्या दिवसी झेंडा वंदन करणे इतक्या पुरतेच आपले कर्तव्य मर्यादीत नाही.  आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र जगता आले पाहिजे. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. independence day marathi quotes, independence day in marathi language

 

15 ऑगस्ट (15 august 2022) या दिवशी आपण इंग्रजांच्या जुलमी सत्तेपासून मुक्त झालो, आणि आपल्या देशात लोकशाही स्थापन झालेली आहे. जगातील सर्वात मोठं लोकतंत्र आपल्या भारत देशात आहे. आपण प्रत्येकाने आपल्या भारत देशा बद्दल आणि या भारत देशाला स्वतंत्र मिळवून देणाऱ्या क्रांती वीरांचा नेहमी आदर ठेवला पाहिजे.

 

या वर्षीचा 15 ऑगस्ट(15 august 2022) म्हणजेच स्वतंत्र दिवस हा आपल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी खास आहे कारण की, या 15 august ला आपल्याला स्वतंत्र मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपण या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. त्यामुळे या वर्षी आपल्या देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

 

 

१५ ऑगस्ट च्या दिवशी सर्वात महत्वाचे म्हणजे आपण विकत घेतलेले राष्ट्र ध्वज म्हणजेच झेंडे हे आपण १५ ऑगस्ट झाल्यानंतर रस्त्यावर फेकून देऊ नये. ते तसेच व्यवस्थित ठेवावे कारण त्या झेंड्यावर कुणाचाही पाय पडून झेंड्याचा अपमान होता कामा नये.

तर सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

वंदे मातरम्.

स्वतंत्र दीन चिरायू होवो.

 

 

अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्रानो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

 

हे नक्की वाचा :- रक्षाबंधन 2022 माहिती 

 

 

1 thought on “15 ऑगस्ट 2022 माहिती– Swatantrata Diwas Mahiti – Independence Day Information in Marathi”

Leave a Comment