माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज कसा करायचा RTI application online Maharashtra

माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज कसा करायचा RTI application online Maharashtra मित्रांनो माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत तुम्ही भारतातील कोणतेही व कुठलीही माहिती अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने घर बसल्या तुमच्या घरी पोस्टाने मिळवू शकता. मित्रांनो अगदी सरपंचापासून ते मंत्रालय विभागा पर्यंतची सर्व माहिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून मिळवू शकता. 

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण माहितीच्या अधिकारा अंतर्गत (RTI ONLINE APPLICATION PROCESS MAHARASHTRA) ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सर्व प्रक्रिया पाहिली आहे. मित्रांनो तुम्ही माहितीच्या अधिकारा अंतर्गत तुम्हाला हवी असलेली कोणतीही माहिती अगदी सहजतेने मिळू शकता मित्रांनो तुम्ही ग्रामपंचायत, सरपंच, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय त्याचप्रमाणे सर्व मंत्रालयीन विभाग व तुम्हाला हवी असलेली भारतातील कुठलीही माहिती तुम्ही अगदी सहजतेने मिळू शकतात त्यासाठी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करून ही माहिती मिळवू शकता.आणि तुम्ही माहितीच्या अधिकार अंतर्गत अर्ज केल्यानंतर तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती सुद्धा पाहू शकता.


Rti online application process Maharashtra in Marathi. माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज कसा करायचा RTI application online Maharashtra
माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज कसा करायचा RTI application online Maharashtraमाहितीच्या अधिकारासाठी अर्ज कसा करायचा (How to apply for RTI):-


माहितीच्या अधिकाराअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील प्रक्रिया करायची आहे.

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्यूटर मध्ये गुगल क्रोम ब्राउजर ओपन करा. किंवा मग तुम्ही जे ब्राऊजर वापरत असाल तर ब्राउजर ओपन करा. ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्वप्रथम त्या सर्च बॉक्स मध्ये mahiticha adhikar हा शब्द  टाईप करा. किंवा  RTI Maharashtra हा शब्द टााईपकरून सर्च करा.

 आता  आपल्यासमोर https://rtionline.maharashtra.gov.in/

ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल.   वर क्लिक करायचे आहे आता तुम्हाला या वेबसाईटवर क्लिक करायचा आहे किंवा मग तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये ही वेबसाइट ओपन करू शकता. आता तुमच्यासमोर ही वेबसाइट ओपन झालेली आहे आणि तुम्हाला या वेबसाईटचा इंटर्फेस दिसत असेल.

How to apply for RTA online माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज कसा करायचा RTI application online Maharashtra RTI Maharashtra India


आता तुम्हाला या ठिकाणी माहितीच्या अधिकाराचा अर्ज करण्यासाठी अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आता त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला  विविध माहिती दिसेल. ती माहिती वाचून घ्यायची आहे आणि खाली असलेल्या चेक बॉक्स वर क्लिक करायचे आहे. चेक बॉक्स वर क्लिक केल्यानंतर सबमिट करा/दाखल करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. ( RTI online application)


आता तुमच्यासमोर माहितीच्या अधिकाराचा अर्ज ओपन झालेला दिसेल तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला ज्या विभागामध्ये अर्ज करायचा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ज्या विभागातून माहिती हवी आहे तो विभाग तुम्ही या ठिकाणी निवडा.तुम्ही या ठिकाणी कोणताही विभाग निवडू शकतात तुम्हाला ज्या विभागात माहितीच्या अधिकारासाठी अर्ज करायचा आहे, तो विभाग या ठिकाणी निवडा.

त्यानंतर तुमचं नाव टाका, तुमचं जेंडर (Gender), तुमचा ऍड्रेस टाका, त्यांत तुमचा पिन कोड टाका कंट्री या ऑप्शन समोर भारत हा ऑप्शन निवडा. 

त्यानंतर तुमचं राज्य, तुमच्या तालुका, तुमचं गाव, ह्या बाबी निवडा. 

जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर लोकेशन या पर्याय समोर ग्रामीण(rural) निवडा जर तुम्ही शहरी भागातून असाल तर तुम्ही लोकेशन या पर्याय समोर शहरी(urban) निवडा.

आता या ठिकाणी शैक्षणिक स्थिती (Education Status) या पर्याय समोर तुम्ही तुमची शैक्षणिक स्थिती टाका जर तुम्ही साक्षर असाल शिक्षित असाल तर साक्षर (literate) हा पर्याय निवडा. जर तुम्ही शिक्षित नसाल निरक्षर असाल तर निरक्षर (illiterate) हा पर्याय निवडा.(Mahiticha adhikar)


त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर फोन नंबर आणि तुमचा ईमेल आयडी टाका. नागरिकत्व(citizenship) या पर्याया समोर भारतीय निवडा.

कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार करा ऑनलाईन/ तक्रार करा ऑनलाईन

Is the Applicant Below Poverty Line ?/अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का ? या पर्याय समोर तुम्हाला जर तुम्ही दारिद्र्यरेषेखालील असाल तर होय करा किंवा मग नाही करा.जर तुम्ही या ठिकाणी दारिद्य्ररेषेखाली आहे असे केले तर तुम्हाला तुमच्या दारिद्र्यरेषेच्या कार्डचा नंबर(BPL Number) टाकायचा आहे.जर तुम्ही दारिद्र्यरेषेखालील असेल तर तुम्हाला या अर्जासोबत कोणतेही पेमेंट करण्याची गरज नाही जर तुम्ही दारिद्र रेषेखालील नसाल तर तुम्हाला हा अर्ज सादर करतेवेळी दहा रुपयाचे पेमेंट करावे लागेल.

Text for RTI Request application/माहिती अधिकार विनंती अर्ज मजकूर  या पर्याय समोर तुम्हाला एक बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये तुम्हाला जी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मिळवायची आहेे त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजेेच मित्रांनो तुम्हाला माहितीच्या अधिकारातून जी माहिती मिळवायची आहे त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण या ठिकाणी द्या. जर तुमच्याकडे दारिद्र्यरेषेचे कार्ड असेल तर ते कार्ड तुम्ही choose file या पर्यायावर क्लिक करून तुमचे दारिद्र्यरेषेचे कार्ड अपलोड करा. आता खालती दिसत असलेला तुम्हाला CAPTCHA हा टाइप करा आणि submit वर क्लिक करा.सबमिट केल्यानंतर तुम्हाला दहा रुपयाचे पेमेंट करायचे आहे पेमेंट केलं तर तुमचा अर्ज हा सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही माहिती घरबसल्या मिळवू शकता. तुम्ही केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या अर्जाची स्थिती पहा How to check RTI status :- 


मित्रांनो तुम्ही केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला वरती दिसत असलेल्या सद्यस्थिती पहा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 

त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका आणि तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता तो ईमेल आयडी टाका आणि खालच्या साईडला दिसत असलेल्या captcha टाका आणि show दाखवा या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस दिसेल.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही माहितीच्या अधिकारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि कोणतीही माहिती घरबसल्या मिळवू शकतात आणि तुम्ही केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या अर्जाचे स्टेटस सुद्धा ऑनलाइन चेक करू शकता.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील सर्व बांधवांना ही महत्वपूर्ण माहिती समजेल.


 


Post a Comment

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने