कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार करा ऑनलाईन (कोणतीही तक्रार करा ऑनलाईन)

कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार करा ऑनलाईन (कोणतीही तक्रार करा ऑनलाईन)मित्रांनो शासनाचे अनेक प्रकारची विभाग असतात. त्यामधे अनेक शासकीय कर्मचारी असतात. आणि हे जर शासकीय कर्मचारी बरोबर काम करत नसेल,कुठे तरी भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही अश्यांची तक्रार करू शकता. मित्रांनो सहसा आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला ही तक्रार कुठे करायची कशी करायची या विषयी माहिती नसते. त्यामुळे आपण या गुंता गुंतीत पडत नाही,परंतु असे केल्याने आपल्या समाजातील भ्रष्टाचार कमी नाही होणार उलट वाढेल.

कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार करा ऑनलाईन (कोणतीही तक्रार करा ऑनलाईन) Maharashtra apale sarkar grievance
कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार करा ऑनलाईन (कोणतीही तक्रार करा ऑनलाईन)

 

 

 

मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाइन घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा computer च्या साहाय्याने ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता त्याच बरोबर तुम्ही केलेल्या तक्रारीचे ऑनलाइन स्टेटस सुध्दा चेक करू शकता. मित्रानो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आपले सरकार च्या grievance  portal वरून तुम्ही निःशुल्क कोणत्याही विभागाची तक्रार ऑनलाइन करू शकता. अगदी सरपंच पासून ते मंत्रालय विभाग पर्यंत च्या सर्व तक्रारी तुम्ही ऑनलाइन करू शकता.(Apale Sarkar Grievance online) आणि तुम्ही तक्रार केल्यानंतर तुमच्या तक्रारीचे निवारण 21 दिवसांमध्ये करण्यात येते.

कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार ऑनलाइन कशी करायची:-

मित्रांनो कोणत्याही शासकीय विभागाची ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा computer मध्ये गुगल ओपन करून त्या search बॉक्स मध्ये  Apale sarkar Grievance हे टाइप करून सर्च करा किंवा
Directly
ही वेबसाईट ओपन करा. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही तक्रार दाखल करा या पर्यायावर क्लिक करा.
Online complent apale Sarkar grievance कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार करा ऑनलाईन (कोणतीही तक्रार करा ऑनलाईन)

 

आता या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर व तुमचा ईमेल आयडी टाकून सत्यापित करून घ्या. येथे तुम्हाला अकाउंट बनवण्याची गरज नाही.
मोबाईल नंबर व email id टाकल्यानंतर सत्यापित या पर्यायावर क्लिक करा आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल नंबर वर एक otp गेला असेल तो otp तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे.
Otp टाकल्या नंतर आपला नंबर व ईमेल सत्यापित झाल्यावर आता तुम्ही लॉगिन व्हाल.
कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार करा ऑनलाईन (कोणतीही तक्रार करा ऑनलाईन)

 

आता या ठिकाणी तुम्हाला नावाची नोंद करा या पर्यायावर क्लिक करा व तिथे तुमचे पूर्ण नाव टाका.
आता तुम्हाला प्रशासन स्तर निवडायचा आहे त्यामधे तुम्ही ज्या प्रकारची तक्रार करणार आहात. त्यानुसार प्रशासन स्तर निवडायचा आहे. त्यामधे जिल्हा किंवा मंत्रालय या पैकी एक निवडा.
त्यानंतर तुमचा जिल्हा व ते निवडा  या सर्व योजना निवडल्या नंतर
आता तुमची तक्रार या ऑप्शन समोर तुमची जी कोणतीही तक्रार असेल ती सविस्तर या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे.
तुमची जी तक्रार असेल त्याची विस्तृत माहिती इथे द्या.
आता प्रतिमा upload करा दस्तऐवज अपलोड करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे जे काही पुरावे असतील,त्याच प्रमाणे तुमच्या तक्रारी विषयी चे जे कागदपत्रे आहे ते तुम्ही अपलोड करा.याची size ही 2 mb पेक्षा कमी पाहिजे.(online complent of any department)
आता शेवटी captcha टाकून तुमची तक्रार ऑनलाईन सबमिट करा.
सबमिट केल्यानंतर तुमचा एक टोकन नंबर हा generate होईल तो जपून ठेवा त्याचे काम पडेल.

तक्रारीची सद्यस्थिती पहा ऑनलाइन:-

मित्रांनो तुम्ही जी तक्रार केली आहे त्या तक्रारीची स्थिती (status) तुम्ही ऑनलाईन पाहू शकता.
कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार करा ऑनलाईन (कोणतीही तक्रार करा ऑनलाईन)

 

त्यासाठी याच वेबसाईट च्या होम पेज वर या व तक्रारीची सद्यस्थिती पहा 
या पर्यायावर क्लिक करा व तुमचा जो टोकन नंबर आहे तो टोकन नंबर टाकून तुमच्या तक्रारी ची स्टेटस तुम्हाला ऑनलाईन दिसेल.
 मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही शासकीय विभागाचे ऑनलाइन तक्रार करू शकता अगदी सरपंचापासून ते मंत्रालयापर्यंत सर्व तक्रारी तुम्ही ऑनलाईन करू शकता मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडल्यास नक्की शेअर करा.
 

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा यामध्ये संपूर्ण माहिती पाहिली आहे

 

तक्रारदाखल करण्यापूर्वी खालील खबरदारी घ्या:-

१. खालील विषय / बाबी तक्रारनिवारण प्रणालीच्या प्रयोजनार्थ तक्रार या सदरात मोडणार नाहीत.
1. माहितीचा अधिकार संबंधित प्रकरणे.
2. न्यायप्रविष्ट प्रकरणे किंवा निकालाधीन असणारी प्रकरणे.
3. धार्मिक बाबी
4. शासनास सूचना करणे
(कृपया उपरोक्त बाबीशी संबधित निवेदने “तक्रार म्हणून गणली जाणार नाहीत)
२.कृपया योग्य प्रशासन पातळी निवडा योग्य प्रशासन पातळी निवडल्यास तक्रारीचे जलद निवारण होईल.
जिल्हा पातळी-गाव तालूका जिल्हा स्तरावरील सरकारी कार्यालयातील कामकाजाच्या अनुषंगाने उद्भवणान्या तक्रारी मंत्रालयपातळी-मंत्रालयीन विभागांच्या कार्यक्षेत्रातील बाबी तसेच धोरणात्मक बाबींच्या अनुषंगाने उद्भवणा-या तक्रारी
३. कृपया योग्य मंत्रालयीन विभाग निवडा योग्य विभाग निवडल्यास आपल्या तक्रारीचे निवारण लवकर होऊ शकेल
४. जिल्हास्तरासाठीकृपया योग्य प्रशासन प्रकार निवडा.

अ. जिल्हाधिकारी-महसूल विभागातील गावपातळीवरील तलाठी तहसीलदार प्रांत आणिजिल्हाधिकारी यांचे अधिपत्याखालील कामकाजाच्या संबंधातील पुढीलतक्रारी:-

बोगस डॉक्टर विरुद्ध तक्रार, जमीन महसूल अधिनियम बिगरशेती परवानगी, फेरफार नोंदी, 7/12 उतारे इत्यादी, सार्वजनिक वितरण व्यवस्था रेशन काई, स्वस्त धान्य दुकान इत्यादी, सेतू केंद्रातून मिळणाऱ्या ऑनलाईन सेवा जातीचा दाखला, अधिनिवास दाखला इत्यादी, रोजगार हमी योजना / मनरेगा कामाची मंजुरी तसेच मजुरांना मजुरी वाटप/ इतर बाबी, वाळू व इतर गौण खनिजे, नैसर्गिक आपत्ती (दुष्काळ इ) कामकाज, अनुदान वाटप, संजय गांधी योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावण बाळ योजना कुळकायदा नवीन शर्त जमीन मंजुरी (महार वतन जमीन ), भूसंपादन व अनुषंगिक नुकसान भरपाई * बाधित शेतक-्यांचे पूनर्वसन -भूखंड वाटप , पर्यायी जमीन इ, नगरपालिका तक्रारी (महानगर पालिका वगळून), स्वातंत्र्यसैनिक पेंशन, करमणूक कर, विडिओ थिएटर , लॉजिंग परवाना व नूतनीकरण शस्त्र स्फोटक पदार्थ यांचा परवाना, निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका विधानसभा व लोकसभा, राजशिष्टाचार, पगार, पेन्शन, भिवष्य निवार्ह निधी, प्रवास भत्ता (सरकारी कर्मचारी इ, कर्माचार्यांच्या बदल्या ,निलंबन व बडतर्फ इतर
पुढील विषय सुद्धा जिल्हाधिकारी यांचेकडून हाताळलेजातील:-
विदयुतपुरवठा (घरगुती तसेच शेतपंप / औद्योगिक वीजपुरवठा), सहकारी संस्था सेवा संस्था, पतसंस्था इ, परिवहन (RTO) कार्यालये, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

ब.जिल्हापरिषद – ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हापरिषद यांचे अधिपत्याखालील कामकाजाच्या संबंधातील तक्रारी:-

ग्रामपंचायत माध्यमातून राबविण्यात येणार्या योजना, ग्रामपंचायत प्रशासन संबंधित बाबी, जिल्हा परिषद अतिरिक्त वर्ग नवीन प्राथमिक शाळा ओळख, प्राथमिक शाळा / शौचालये दुरुस्ती शालेय विद्यार्थ्यासाठी पोषक आहार, प्राथमिक शाळा संबंधित इतर बाबी माध्यमिक शाळा संबंधित इतर बाबी, पाळणाघर,बालवाडी इमारत / शौचालय बांधण्यासाठी, कुपोषित मुलांसाठी अतिरिक्त आहार,इयत्ता 5 ते 7 वी मुली -सायकली पुरवठा,बालवाड़ी केंद्र बाल गणवेश,प्राथमिक उपचार, प्रतिबंधात्मक सेवा, स्थानिक पातळीवर अस्तित्वात रोग प्रतिबंध आणि नियंत्रन, प्रजनन विषयक व बाल आरोग्य सेवा,आरोग्य आणि आहार शिक्षण, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, शालेय आरोग्य तपासणी / अंगणवाडी तपासणी, स्वमदत गट, इंदिरा आवास योजना, पाणलोट क्षेत्र क्षेत्र विकास कार्यक्रम (CADA), दारिद्रय रेषेखालील कल्याण योजना राबवित, कृषी संदर्भातील,पाणी पुरवठा योजना रुंदीकरण विद्यमान चांगले खोलीकरण आणि /दुरुस्ती नवीन पाणी पुरवठा योजना, हात पंप,ग्रामीण रस्ते मजबुतीकरण आणि दुरुस्ती,तिर्थक्षेत्र /पर्यटन विकास कार्यक्रम के.टी. पोशाख पर्यंत दलितवस्ती सुधारणा योजना,स्मशाने /अंगणवाडी इमारत बांधकाम, एजन्सी (v. पी एस /व्ही सी सी / टेकडी / खासदार निधी), लहान पाटबंधारे प्रकल्पातील 100 सिंचन क्षमता पाझर तलाव, साठवण धरणे हेक्टर, जवाहर विहिरी, प्राणी, लसीकरण, कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया ई उपचार, अपंग, इ.स.पू. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, अनुदानित वसतिगृहे शाळा. बेरोजगार महिला आणि ग्रामीण भागात मुलींसाठी योजना, शारीरिक विकास आणि मुलींना स्वत ची संरक्षण प्रशिक्षण योजना, महिलांसाठी सल्ला केंद्र, महिलांसाठी कायदेशीर सल्ला, विविध काम रक्कम खर्च, भेटी, प्रोत्साहन, कर्मचारी इ जिल्हा / आंतर जिल्हा बदल्या, जिल्हा परिषद मालकीच्या इमारती देखभाल व दुरुस्त इतर

क. पोलीस जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेच्या कामकाजाच्या संबंधातील तक्रारी:-

सायबर गुन्हे,पोलिसांचे तकारी /कर्मचारी यांच्या बद्दल तक्रार, महिला वरील अत्याचार विनयभंग, महिला वरीलअत्याचार कुटुंब हिंसाचार, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या वर होणारे अत्याचार, खून खुनाचा प्रयत्न / प्राणघातक हल्ला / संशयास्पद मृत्यू / अपघाती मृत्यू, आर्थिक गुन्हे सर्व प्रकारच्या आर्थिक फसवणूक, रोड, महामार्ग गस्त रस्ता /महामार्ग दरोडा प्रकरणे वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी उपाय योजना, व्यक्तींचे अपहरण /हरवलेले / बेपत्ता प्रकरणे, जीवनावश्यक वस्तूंच्या भेसळ संबंधी, पोलीस रक्षक आणि पोलीस संरक्षण, पासपोर्ट पड़ताळणी तसेच चारित्र्य पड़ताळणी (खाजगी सार्वजनिक सेवा, सुरक्षा एजन्सी, आरटीओ बॅच), शस्त्र परवाना, परमिट रूम, व्हिडिओ गेम, सायबर कॅफे, इ ना हरकत प्रमाणपत्र(NOCS), हॉटेल्स परवाना मिळणे बाबत, रॅगिंग, गोवंश हल्या प्रतिबंध, मानवी तस्करी, मानवी हक्क बाबतचे गुन्हे, बाल गुन्हेगारी, बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, मृत व्यक्ती मालमत्ता, पोलीस कल्याणकारी योजना, धार्मिक आणि जातीय तणाव / दंगली इतर

ड.महानगरपालिका- महानगरपालिकेच्या कामकाजाच्या संबंधातील तक्रारी:-

(नगरपालिका / नगरपरिषद यांच्या तक्रारी संबधित जिल्हाधिकारी यांचेकडे कराव्यात)
पर्यावरण संबंधित, अग्निशमन दल, विवाह नोंदणी,सार्वजनिक वाहतूक,कर (पाणी, मालमत्ता, एलबीटी इ),घनकचरा व्यवस्थापन,गटार नाला,पावसाच्या पाण्याचे निचरा,रस्ते व वाहतूक,कारखाने,परवाना,पाणीपुरवठा,कीटक नियंत्रण, इमारती
आरोग्य,अतिक्रमण, दुकाने व आस्थापना, शाळा इतर

Leave a Comment