आपले सरकार सेवा केंद्र | Apale Sarkar Seva Kendra

आपले सरकार सेवा केंद्र  नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण आपले सरकार सेवा केंद्र कसे मिळवायचे या विषयी संपूर्ण माहिती पाहत आहोत.मित्रांनो तुम्ही स्वतःचे आपले सरकार सेवा केंद्र चालू करून तुमच्या ग्राहकांना चांगल्या सेवा उपलब्ध करून देऊन चांगले उत्पन्न मिळवू शकता  Apale Sarkar Seva kendra हे  तुम्ही मिळवु शकता आणि यामध्ये तुम्ही तुमच्या ग्राहकाला विविध सेवांचा लाभ देऊन उत्पन्न मिळवू शकता.आपले सरकार सेवा केंद्र यालाच सेतू केंद्र,महा ई सेवा केंद्र असे सुद्धा म्हणतात.आणि या apale sarkar seva kendra  च्या माध्यमातून तुम्ही तहसील मार्फत देण्यात येणारे अनेक प्रकारचे दाखले काढून तुमच्या ग्राहकाला सेवा पुरवू शकतात.जसे की; उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला,राष्ट्रीयत्व,वय अधिवास इत्यादी अनेक प्रकारचे दाखले काढून देऊ शकतात.

 

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणीआपले सरकार सेवा केंद्र | Apale Sarkar Seva Kendra
आपले सरकार सेवा केंद्र | Apale Sarkar Seva Kendra

 

 

आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे काय? What is Apale Sarkar Seva Kendra

मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र यालाच आपण सेतू असे सुद्धा ओळखले जाते.या apale Sarkar Seva kendra च्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे तहसील कार्यालय प्रमाणेच सेतू केंद्र चालू करू शकता  ज्या मध्ये तुम्ही तुमच्या ग्राहकाला सेवा पुरवू शकतात जसे की; उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला,राष्ट्रीयत्व,वय अधिवास इत्यादी  एवढेच नाही तर तुम्ही या आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून अनेक प्रकारचे कामे करू शकता.आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता. आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी
 

आपले सरकार सेवा केंद्र साठी कागदपत्रे:-

१)आधार कार्ड
२)पॅन कार्ड
३)संगणकीय प्रमाणपत्र – MSCIT/CCC/OTHER
४)शैक्षणिक अर्हता- १२ वी किंवा त्यापेक्षा जास्त
५)Csc सेंटर असल्यास त्या संबंधी प्रमाणपत्र
६)अनुभव प्रमाण पत्र (असल्यास)
७) अपंग प्रमाणपत्र (असल्यास)
ज्यांच्याकडे आधीपासूनच CSC आयडी आहे त्यांना आपले सरकार सेवा केंद्र  मिळवण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असते, आणि त्यांना अर्जासोबत csc चे  अनुभव प्रमाणपत्र जोडायचे आहे. आणि csc सेंटर असल्याचे प्रमाणपत्र जोडायचे आहे.
जर अर्जदार अपंग असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येत असते परंतु अपंगत्व हे ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याची पद्धत How to Get Apale Sarkar sewa kendra

मीत्रांनो जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र मिळवायचे असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत असाल त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत किंवा जिल्हा सेतू समिती मार्फत आपले सरकार सेवा केंद्र साठी जागा(vacancy) निघत असतात. त्यावेळेस आपल्याला त्या जिल्ह्याच्या वेबसाईट वर जाऊन vacancy निघाल्या का हे पहायच्या असतात आणि निघाल्या असेल तर तुम्हाला तो फॉर्म डाऊनलोड करायचा असतो.जर तुम्हाला जिल्ह्याची वेबसाईट माहित नसेल तर Google च्या search बॉक्स मध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव व समोर वेबसाईट असे टाईप करून सर्च केल्यास तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट मिळेल. जसे; yavatmal website
https://yavatmal.gov.in/ हि जिल्ह्याची वेबसाईट आहे.
Aaple sarkar seva kendra new application registration

 

जिल्ह्याच्या वेबसाईट वर गेल्यानंतर आता आपल्याला एक ऑप्शन दिसेल किंवा जाहिरात दिसेल आपले सरकार सेवा केंद्र अर्ज किंवा/ आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात म्हणून
आपले सरकार सेवा सेंटर अर्ज नोंदणी जाहिरात
आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात

 

तुम्हाला याच ऑप्शन वर क्लिक करून ती जाहिरात डाऊनलोड करायची आहे आता ही जाहिरात  डाऊनलोड करण्यासाठी download ऑप्शन वर क्लिक करा.
Aaple sarkar seva kendra Application आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी

 

या पर्यायावर क्लिक केल्यावर अर्ज डाऊनलोड होईल आणि आता तुम्हाला अर्ज
आपले सरकार सेवा केंद्र अर्जाचा नमूना आपले सरकार सेवा केंद्र अर्ज
आपले सरकार सेवा केंद्र अर्जाचा नमूना

 

Download केल्यानंतर व्यवस्थित पणे भरून आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज व कागदपत्रे दिलेल्या वेळेतच जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये जमा करावे लागेल. तुम्ही जिल्ह्याच्या वेबसाईट वरून जो अर्ज download केला त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या ग्राम पंचायत मध्ये जागा रिक्त आहेत याची यादी दिसेल. अर्ज submit केल्या नंतर जिल्ह्याच्या वेबसाईट वर पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर होत असते.व यामध्ये पात्र व मंजूर लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येतेे.
 

आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी पात्रता:-

१) शैक्षणिक पात्रता कमीत कमी बारावी पास पाहिजे
२) कम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे जसे mscit/Ccc
३) तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जागा रिक्त पाहिजे
४) जर अर्जदार अपंग असेल तर कमीत कमी 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व पाहिजे.
जर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू केंद्र च्या अंतिम लाभार्थी यादी मध्ये पात्र झाला तर तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची छाननी करायची असते. व आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासाठी जे साहित्य लागते ते सुद्धा विकत घ्यावे लागेल.नंतर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र ची सरकारतर्फे आयडी आणि पासवर्ड मिळेल.

आपले सरकार सेवा केंद्र साठी नियम व अटी:

आपले सरकार सेवा केंद्र चालवण्याबाबत सर्वसाधारण अटी व शर्ती खालील प्रमाणे.
१. केंद्र मंजूर ठिकाणीच चालविण्यात यावे अन्यथा इतर ठिकाणी आढळून आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येऊ शकते.
२. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालू ठेवून नागरिकांना सेवा पुरविणे,
३. शासनाने ठरवून दिलेल्या branding चा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकरणी न करणे.
४. सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे.
५. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवून दिलेल्या वेळापत्रक व निर्देश काटेकोरपणे पाळणे.
६. आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असावा. जर त्या गावातील नागरिकाचा अर्ज आला नसेल तर जवळच्या गावातील रहिवासी असलेल्या अर्जाचा विचार करणेत येईल.
७. अर्ज सदर करताना अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत सदर करणे बंधनकारक राहील. त्यानंतर अर्जदाराकडून कोणतीही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही.
८. नागरिक फक्त एकच आपले सरकर सेवा केंद्र साठी अर्ज करु शकतात.त्याच्या कुटुंबातील दुसरा अर्ज प्राप्त झाल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
 ९. अर्जामध्ये माहीती चुकीची आढळल्यास अर्ज रद्द करून त्यांच्यावर कार्यदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
१०.आपले सरकार सेवा केंद्रांना शासनाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळेवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल.
११. प्रस्तावित आपले सरकार सेवा केंद्रांच्या गावामध्ये केंद्र देण्याबाबतचे किंवा केंद्र रद्द करण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतु समिती यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे.
१२. जाहिरातीत दर्शवलेल्या आपले सरकार सेवा केद्रांच्या ठिकाणामध्ये भविष्यात बदल होण्याची शक्यता आहे. एका केंद्राला एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास योग्य पर्यायाच्या आधारे उमेदवाराची निवढ करणे याबावतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतु समिती,  यांनी राखून ठेवले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी  यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही. जर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र मिळवायचे असेल तर तुम्हाला वेळोवेळी आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन चेक करावे लागते. आपण आपल्या वेबसाईटवर सुद्धा वेळोवेळी आपले सरकार सेवा केंद्र च्या जाहिराती निघाल्यानंतर अपडेट देत असतो.

 

आपले सरकार सेवा केंद्र अंतिम पात्र लाभार्थी यादी जाहीर

 

मित्रांनो अश्या पद्धतीने तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज करून Apale Sarkar Seva kendra मिळवू शकता.
आणि यामध्ये वरील पाहिलेल्या अटी,पात्रता,कागदपत्रे यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो.ही पद्धत सर्व जिल्ह्यांसाठी सारखीच असते.
 

आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल लेख आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा

 

1 thought on “आपले सरकार सेवा केंद्र | Apale Sarkar Seva Kendra”

Leave a Comment