पिक विमा कंपनी अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पिक विमा ची रक्कम जमा करणे चालू झालेले आहे, राज्यातील तब्बल सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली आहे त्यामध्ये, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे, 13 नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीच्या काळामध्ये मिळावी याकरिता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अंतर्गत प्रयत्न चालू होते, तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे असल्याने त्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विम्याची रक्कम दिवाळीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची ग्वाही देण्यात आलेली होती.
धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातील सोयाबीनचा पिक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम वितरीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तब्बल 6 लाख 34 हजार शेतकऱ्यांचा समावेश असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा करण्यात येणार आहे. अशाप्रकारे बीड जिल्ह्यातील तब्बल सहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 ऑक्टोबर रोजी अग्रीम पीक विम्याची रक्कम सोयाबीन पिकासाठी ची जमा करण्यात आलेली आहे.
कापूस सोयाबीन दर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काय आहेत? पहा संपूर्ण माहिती