पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडे हे पैसे वापस न केल्यास कारवाई | PM Kisan Yojana 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत देशामध्ये 2019 पासून पी एम किसान योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना एकूण तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपयांच्या रकमेत वितरीत करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची आर्थिक मदत हवी, हाच दृष्टीकोन पी एम किसान योजना चालू करण्यात मागचा आहे.

पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील अनेक शेतकरी पात्र असून शेतकऱ्यांना काही अटी व शर्ती पूर्ण करून पात्र ठरविण्यात आलेली आहे, तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 14 हप्त्याचे वितरण योजना अंतर्गत करण्यात आलेले आहे. परंतु दिवसेंदिवस योजने अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटत चाललेली, काही शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा काही अटी पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेली आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत असे अनेक शेतकरी आहेत,की त्या शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र नसून सुद्धा योजनेचा लाभ घेतलेला आहेत, तसेच अनेक हप्ते पीएम किसान योजनेअंतर्गत त्यांनी घेतलेली आहे परंतु ते शेतकरी पात्र नसल्याने त्यांना आता वितरित करण्यात आलेल्या हप्त्याची रक्कम वापस करावी लागणार आहे. 31 मार्च 2023 पासून देशांमध्ये एक प्रकारची मोहीम राबविण्यात आलेली होती, त्यामध्ये अपात्र शेतकऱ्यांना योजनेतून काढून टाकण्यात आलेले होते व अशाच शेतकऱ्यांना सरकारकडे संबंधित मिळालेल्या हप्त्याची रक्कम वापस करावी लागणार आहे.

अनेक शेतकरी योजनेअंतर्गत अपात्र असून सुद्धा लाभ घेताना दिसत आहे, त्यामध्ये अनेक नागरिकांना सरकारी नोकऱ्या आहे तरीसुद्धा योजनेअंतर्गत ते पात्र ठरवून योजनेचा लाभ घेत होते व अशा शेतकऱ्यांनी जर लवकरात लवकर सरकारकडे पैसे जमा केले नाहीत तर त्यांच्यावर मोठी कारवाई सुद्धा केली जाऊ शकते, त्यामुळे अपात्र असून सुद्धा आतापर्यंत योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सरकारकडे मुदतीच्या आत पैसे जमा करणे आवश्यक आहे.

पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडे हे पैसे वापस न केल्यास कारवाई | PM Kisan Yojana 

खत अनुदान देण्यास मंजुरी, 2023-2024 करिता 22 हजार 303 कोटींची तरतूद

Leave a Comment