या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील 10 दिवसात होणार पिक विम्याचे वाटप | Pik Vima Watap

यावर्षी राज्यांमध्ये पावसाचा मोठा प्रमाणात खंड पडलेला होता व अशा स्थितीमध्ये शेती पिके पूर्णतः वाळून जाण्याच्या स्थितीमध्ये होती, तसेच पडलेल्या पावसाच्या खंडामुळे उत्पादनामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना थोडे आर्थिक स्थैर्य मिळावे याकरिता अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळी पूर्वी वितरित होणे गरजेचे आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा नोव्हेंबर पासून म्हणजेच दिवाळीच्या एक ते दोन दिवस आधी पीक विम्याची रक्कम वितरित करण्याची सुरुवात होईल, सोयाबीन मका व बाजरी या पिकासाठीचा हा अग्रीम पिक विमा असेल. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर व कांदा या पिकाला मात्र ही रक्कम मिळणार नाही आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत पिक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आलेले होते की, जिल्ह्यातील 92 महसूल मंडळ तसेच आठ तालुक्यांमध्ये विमाधारक शेतकऱ्यांना नागरिक पीक विम्याचे वाटप करण्यात यावे, या प्रकारचा निर्णय देण्यात आलेला असला तरी सुद्धा पिक विमा कंपनी अंतर्गत याबाबत कोणताही निर्णय पुढे देण्यात आलेला नव्हता.

त्यामुळे कुमार आशीर्वाद यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांच्याशी चर्चा साधलेली होती, तसेच सीमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सुद्धा बैठक साधून चर्चा करण्यात आलेली होती व पिक विमा देण्याबाबतचा पाठपुरावा सतत करण्यात आलेला होता.

Leave a Comment