आता कोणते पिक कधी घ्यायचे याची माहिती मिळणार मोबाईल वर, या प्रकारे मिळेल माहिती | Agricultural Information

शेतकऱ्यांना शेतीमध्ये पीक काढत असताना विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते, अशा वेळेस शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व शेतकरी अहवाल दिल होतो, परंतु जर एखादी नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ अतिवृष्टी किंवा वातावरणातील होणारा बदल या सर्व गोष्टीला अनुसरून कोणत्या भागांमध्ये कोणत्या प्रकारचे पीक जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देऊ शकेल यासंबंधीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना मोबाईल द्वारा, कोणत्या भागात कोणत्या प्रकारचे पीक लागवड करायला हवी अशा प्रकारची संपूर्ण माहिती शेतकऱ्याला मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येईल.

आपल्या भारत देशातील एकूण 26 राज्यांमध्ये, केंद्रीय कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या अंतर्गत पारंपरिक योजनांच्या अंमलबजावणीची योजना आखण्यात आलेली आहे त्यामुळे या अंतर्गत देशातील एकूण 26 राज्यांमधील विविध भागातील शेतकऱ्यांना, हवामान बदलानुसार शेती पिकाला चालना देणे, तसेच शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमीत कमी प्रमाणात कसा करता येईल यावर भर देणे. व सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा दृष्टिकोन वळवणे ही मुख्य बाब शेतकऱ्यांना सांगितली जाणार आहे.

देशातील एकूण 26 राज्यातील प्रत्येक गावातील शेतीचा अभ्यास करून त्या शेतीमध्ये कोणत्या प्रकारची पिके येतील कोणत्या प्रकारच्या विकासाचा समावेश करायला हवा हवामानच्या स्थितीनुसार कोणती पिके निवडायला हवी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी जमिनीमध्ये कसे मिळवता येईल यावर भर दिला जाणार आहे. तसेच याची माहिती देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे कळविण्यात येईल.

आता कोणते पिक कधी घ्यायचे याची माहिती मिळणार मोबाईल वर, या प्रकारे मिळेल माहिती | Agricultural Information

पुढील काही दिवसात कापूस दराची स्थिती कशी राहणार? काय आहे तज्ञांचे मत 

Leave a Comment