राज्य शासना अंतर्गत शबरी आवास योजना 2013 पासून चालू करण्यात आलेली आहे, व याच शबरी घरकुल योजने संदर्भातील अधिकृत अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे यासंबंधी अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे..
शबरी घरकुल योजना राज्यामध्ये चालू करण्यात आल्यापासून राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्जाचा नमुना वेगवेगळ्या प्रकारचा दिला जात होता, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कागदपत्रांची मागणी केली जात होती, व अशा प्रकाराला थांबवण्यासाठी राज्य शासना अंतर्गत एक अधिकृत अर्जचा नमुना व आवश्यक कागदपत्रे यासंबंधीचा जीआर काढण्यात आलेला आहे.
संबंधित जीआर मध्ये अर्ज नमुना निर्गमित करण्यात आलेला आहे व अर्ज नमुना बघण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे,त्यावरून अर्ज नमुना बघू शकणार आहात, तसेच संबंधित आवश्यक कागदपत्रे सुद्धा देण्यात आलेली आहे, त्या संबंधित कागदपत्रा ऐवजी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची मागणी करण्यात येऊ नये अशा प्रकारचे सूचना सुद्धा देण्यात आलेले आहे.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रहिवासी दाखला
पासपोर्ट साईज दोन फोटो
जमातीचे प्रमाणपत्र
सातबारा उतारा किंवा नमुना अ
उत्पन्नाचा दाखला
एक रद्द केलेला धनादेश
शिधापत्रिका
अर्ज भरत असताना जर प्रिंट काढून स्वहाताने अर्ज भरला तरीसुद्धा अर्जाचा नमुना स्वीकारण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे. यामुळे आज शबरी आवास योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या आदिवासी बांधवांना अर्ज प्रक्रियेमध्ये व कागदपत्रांमध्ये सुसूत्रता निर्माण झालेली आहे.