राज्यामध्ये गेल्या एक महिन्यापासून पावसाचा खंड आहे, त्यामुळे शेती पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, तसेच फुलावर आलेले सोयाबीन या पाण्याच्या खंडामुळे पूर्णतः वाया जाण्याच्या परिस्थितीमध्ये अडकून बसलेले आहे, तसेच इतर पिके सुद्धा पावसाच्या अभावामुळे करपू लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता अश्या शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विम्याची रक्कम देण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे.
पावसाच्या खंडामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटलेली आहे आणि अनेक पिके कोळपा झालेली आहे आणि नंतर पाणी जरी आले तरीसुद्धा या पिकांचा काहीही उपयोग होणार नाही अशी स्थिती पिकांची पावसाअभावी झालेली आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयांमध्ये पिक विमा काढलेला आहे, तसेच हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान भरपाईची रक्कम अग्रीम स्वरूपामध्ये देण्यात यावी अशी अधी सूचना आयुष प्रसाद जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेली आहे.
जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी मंडळांमध्ये, पावसाचा खंड असल्यामुळे खूप कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी 25% अग्रीम स्वरूपात नुकसान भरपाई करता पात्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना, नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.