Cabinet Dicision: राज्य शासनाने घेतले शेतकऱ्यांसाठी हे महत्वपूर्ण निर्णय, पिक विमा यांचा समावेश

राज्य शासना अंतर्गत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामध्ये अगदी शेतकऱ्यांपासून ते कंपनीच्या मुद्रांक शुल्कापर्यंतचे हे निर्णय आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच संबंधित सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे.

मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये, 837 कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यात येईल, व त्या अंतर्गत नागरिकांना 24 तास कार्यरत कॉल सेंटरवर फोन द्वारे तक्रार नोंदवता येणे शक्य होणार आहे.

मुंबईमध्ये जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव, तसेच मेट्रो कोरड साठी एमएमआरडीएला मोगरपाडा ठाणे येथे जागा हस्तांतरित, व घरांसाठी मध्य नागपूर मधील झोपडपट्टीतील मुद्रांक शुल्कात कपात अशा प्रकारचे विविध निर्णय घेण्यात आलेली आहे.

राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याकारणाने आवश्यक व काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे तसेच राज्यांमध्ये 81.7 टक्के पाऊस झालेला आहे. मुद्रांक शुल्कामुळे सूट देण्याचा निर्णय म्हणजेच केंद्राच्या विविध कंपन्यांना मालमत्ता व जमिनीच्या हस्तांतरण दस्तावर सूट देण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच राज्य सहकारी बँके अंतर्गत शासन हमीवर आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देणार, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची नोंदणी केलेली आहे तसेच पीक विम्याचा अग्रीम, पिण्याचे पाणी, चारा उपलब्ध करण्यासाठी नियोजन करण्यात यावे अश्या प्रकारचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. अशाप्रकारे विविध प्रकारचे निर्णय शासना अंतर्गत घेण्यात आलेले आहे.

Cabinet Dicision: राज्य शासनाने घेतले शेतकऱ्यांसाठी हे महत्वपूर्ण निर्णय, पिक विमा यांचा समावेश

पी एम किसान योजनेच्या 2000 रुपयांचा लाभ पिता व पुत्र दोघानाही मिळवता येतो का? हा आहे नियम

Leave a Comment