Aapale Sarkar seva Kendra : आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी अर्ज सुरू, आवश्यक कागदपत्रासह या तारखेपर्यंत अर्ज करा

आपले सरकार सेवा चालू करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, जिल्ह्या सेतू समिती नांदेड अंतर्गत जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्र चालू करू इच्छिणाऱ्या नागरिकांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आपले सरकार सेवा केंद्र करिता पात्र ठरण्याची एक उत्तम संधी आहे.

आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी 4 सप्टेंबर 2023 पासून ते 22 सप्टेंबर 2023 पर्यंत सायंकाळी 5 पाच वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, तसेच जाहिरातीमध्ये अर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे देण्यात आलेली आहे त्यामुळे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असावी लागतात.नांदेड जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येणार आहे तर ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्रसाठी जागा रिक्त असतील त्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येईल.

 

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1) आधार कार्ड

2) MSCIT प्रमाणपत्र

3) पॅन कार्ड

4) शैक्षणिक प्रमाणपत्र

5) रहिवासी दाखला

6) जागेच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून घर पावती/रेशन कार्ड/लाईट बील

7) अर्जदार आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी नियोजित असलेल्या जागेचा बाहेरील व आतील फोटो

8) अर्जदार दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र

अर्ज शुल्क – 500 रुपये

पात्रता निकष

गावातील रहिवासी त्याच गावातील सीएससी चालकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच जर एकाच गावातील अनेक अर्ज आपले सरकार सेवा केंद्राकरिता आले तर त्यांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात येणार आहे.जर एखाद्या गावामध्ये अर्ज न आल्यास शेजारील गावातील अर्जदारांना त्यात प्राधान्य देण्यात येईल. तसेच पात्र लाभार्थ्यांची यादी 6 ऑक्टोंबर 2023 रोजी काढण्यात येणार आहे. तसेच पात्र लाभार्ती यादी वरून जर कोणाची कम्प्लेंट असेल तर ती कंप्लेंट सुद्धा करता येणार आहे व अंतिम पात्रता यादी 27 ऑक्टोंबर 2023 रोजी करण्यात येईल. तसेच ज्यांची निवड फायनल यादीमध्ये करण्यात येईल त्यांना 20 हजार रुपयांचे डिपॉझिट करावे लागणार आहे.

Aapale Sarkar seva Kendra : आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी अर्ज सुरू, आवश्यक कागदपत्रासह या तारखेपर्यंत अर्ज करा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Aapale Sarkar seva Kendra : आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी अर्ज सुरू, आवश्यक कागदपत्रासह या तारखेपर्यंत अर्ज करा

संबंधित जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment