Staff Selection Commission: उमेदवारांसाठी महत्वाची बातमी, एसएससी भरती परीक्षा पंधरा भाषेमध्ये देता येणार

अनेक राज्यांकडून मागणी केली जात होती की, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC भरती परीक्षा इतर भाषांमध्ये सुद्धा घेतल्या जाव्यात, कारण भाषेच्या अभावामुळे अनेक तरुण सरकारी नोकरी गवत होते, त्यामुळे तरुणांच्या भाषेच्या अडचणीमुळे नोकरीची संधी गमावली जाऊ नये या कारणाने सरकारने परीक्षेसाठी प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यात येईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केलेला आहे आहे.

उमेदवारांना प्रश्न पडलेला असेल नेमक्या कोणकोणत्या भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे, घेणाऱ्या परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये म्हणजेच त्यामध्ये एकूण पंधरा भाषांचा समावेश करण्यात येणार आहे, त्याच पंधरा भाषेमध्ये उमेदवाराला स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून भरती परीक्षा देता येणार आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार भाशेच्या अडचणीमुळे अनेक तरुण नोकरी मुकत होते, त्यामुळे एकूण पंधरा भाषांमध्ये परीक्षा घेतली घेतली जाणार, अनेक राज्यांनी प्रामुख्याने दक्षिणेतील अनेक राज्ये हिंदी व इंग्रजी भाषा व्यतिरिक्तही भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती परीक्षा घेतली जावी अशा प्रकारची मागणी करत होते. तसेच यांच्या मागणीला आता यश आलेले आहे.

एक प्रकारची अनुमती योजना आखली जात आहे त्यामध्ये उमेदवारांसाठी पंधरा भाषांमध्ये चाचणी देण्याचे स्वरूप अनावरण करण्यात आलेले असून लेखी चाचणी 22 अनुसूचित भाषांमध्ये देण्याबद्दलची योजना आखली जात आहे त्यामुळे पंधरा प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेतली जाईल व त्यामुळे अनेक तरुणांना नोकरीची उत्तम संधी प्राप्त होऊ शकेल.

 

या प्रादेशिक भाषांचा समावेश

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीमध्ये, पंधरा भाषांचा समावेश असणार आहे त्यामध्ये, इंग्रजी, हिंदी, मराठी, आसामी, गुजराती, बंगाली, मल्याळम,तमिळ, कन्नड, ओडिया, तेलगू,मणिपुरी, उर्दू, पंजाबी,कोकणी या भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेली आहे.

Staff Selection Commission: उमेदवारांसाठी महत्वाची बातमी, एसएससी भरती परीक्षा पंधरा भाषेमध्ये देता येणार

 महाराष्ट्रात तब्बल 2109 जागांची कृषी विभागात कृषी सेवक भरती, असा करा अर्ज

Leave a Comment