Soybean bollworm infestation: सोयाबीन पिकावरील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, या कीटकनाशकाची फवारणी करा, मिळतील उत्तम रिझल्ट

महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात सोयाबीन ची लागवड केली जाते, तसेच सोयाबीनचे पीक उत्तम रित्या मिळवण्यासाठी व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे अत्यंत गरजेचे असते, सोयाबीनची उत्पादनक्षमता खूप जास्त प्रमाणात आहे तसेच होणारा खर्च कमी प्रमाणात असल्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवल्या जाऊ शकते. दिवसेंदिवस सोयाबीन वर कीटकांचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. कीटकांच्या वाढत्या प्रादुर्भावावर आळा घालने अत्यंत गरजेचे झालेले आहे.

सोयाबीनच्या पानाच्या खाली अनेक प्रकारचे किडे आढळतात, तसेच केसाळ अळी सुद्धा खूप जास्त प्रमाणात आढळत आहे, या अळ्या सोयाबीनच्या पिकाला नुकसान पोहोचू शकतात त्यामुळे वेळेवर कीटकांपासून नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. अळी सोयाबीनच्या पानाच्या खालच्या बाजूला असते तसेच सोयाबीनचा हिरवा भाग खूप जास्त प्रमाणात खातात व त्यामुळे सोयाबीनची पाने जाळी सारखे दिसायला लागतात, ज्यावेळेस पाने जाळी सारखे दिसायला लागली त्यावेळेस शेतकऱ्यांनी वेळेवर सतर्क होऊन कीटकनाशकांची फवारणी करावी.

सोयाबीनच्या पिकावर वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रासायनिक नियंत्रण करणे आवश्यक आहे, जर शेतकऱ्यांनी वेळेवर अळीचे व्यवस्थापन केले नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट पडू शकते, त्यामुळे सोयाबीनवर ज्यावेळेस अळी अटॅक करते किंवा त्याआधी कमी प्रमाणात अळ्या आढळतात त्यावेळेसच शेतकऱ्यांनी योग्य कीटकनाशकाची फवारणी करायला हवी.

सोयाबीन वर केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी फ्लुबेन्डामाइड 39.35% तसेच एस सी 3 मीली हे कीटकनाशक 10 लिटर पाण्यामध्ये विरघळून फवारणी करायला हवी, तसेच क्विनॉलफॉस 25 सिसी 30 मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करायला हवी त्यामुळे सोयाबीन पिकावर असलेल्या केसाळ अळीवर नियंत्रण मिळवता येते.

टीप: शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकांवर फवारणी करताना तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य त्या औषधांची फवारणी करावी.

Soybean bollworm infestation: सोयाबीन पिकावरील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, या कीटकनाशकाची फवारणी करा, मिळतील उत्तम रिझल्ट

खुशखबर, कांदा अनुदान आले! शासन निर्णय जारी, या शेतकऱ्यांना मिळेल इतके अनुदान

Leave a Comment