Krushi Kendra Licence: कृषी केंद्र सुरू करण्यासाठी परवाना कसा काढायचा? कृषी सेवा केंद्र लायसन्स प्रक्रिया

अनेक तरुणांची इच्छा असते की आपणही कृषी सेवा केंद्र उघडावे, त्यामुळे कृषी विषयाचे शिक्षण घेण्याकडे अनेक तरुणांचा कल जात असताना दिसत आहे, परंतु अनेक तरुणांना हे माहित नाही की नेमके कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवायचा कसा? तसेच अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा?अशा प्रकारचे विविध प्रश्न उपस्थित होतात, तर तुमच्या मनामध्ये उपस्थित झालेले, कृषी सेवा केंद्राबद्दलचे संपूर्ण प्रश्न, व परवाना काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या संपूर्ण बाबींची या लेखांमध्ये आपण माहिती बघणार आहोत.

कृषी सेवा केंद्र चालू करण्याची इच्छा अनेकांची असते तसेच या व्यवसायांमधून खूप जास्त प्रमाणात नफा मिळवता येईल अशी अपेक्षा सर्वांचीच असते, अपेक्षेप्रमाणे नफा या व्यवसायातून मिळतो सुद्धा. विविध प्रकारची औषधे,खते, बियाणे यांच्या विक्रीतून खूप प्रमाणात कृषी सेवा केंद्र धारक नफा मिळत असतो. बियाण्याच्या विक्रीमधून मिळणारा नफा 10 ते 11 टक्के एवढा असतो कृषी सेवा सेवा केंद्र चालू करणे आणि अनेक तरुणांची इच्छा असते.

कृषी सेवा केंद्राचा परवाना दिल्यानंतर तो रद्द सुद्धा होतो, याचे नेमके कारण काय हे अनेकांना समजत नाही, परंतु ज्या वेळेस कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळतो तेव्हापासून दर पाच वर्षांनी त्याचे नूतनीकरण गरजेचे असते. तसेच जर तुम्ही बेकायदेशीर रित्या विक्री करत असाल तर परवाना रद्द होऊ शकतो, त्यामुळे योग्य काळजीनिषी कृषी सेवा केंद्र चालवणे गरजेचे असते.

कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्याकरिता कृषी विज्ञान विषयात पदवी असणे गरजेचे आहे, ज्यांना कृषी विज्ञान विषयात पदवी प्राप्त केलेली आहे असेच तरुण-तरुणी परवाना मिळू शकतात, सर्वप्रथम अर्ज करावा लागतो, अर्ज प्रक्रिया आपले सरकार पोर्टल वर जाऊन पूर्ण करता येते तसेच सर्वप्रथम नोंदणी करावी लागते. व त्यावर परवाना मिळवण्यासाठी कर्ज करता येतो.

रासायनिक खते विक्रीचा परवाना हवा असेल तर त्यासाठी लागणारी फी 450 रुपये एवढी असते,तर तुम्हाला कीटकनाशकांसाठी परवाना हवा असेल तर त्यासाठी लागणारी फी 7500 रुपये एवढी असते तसेच जर बियाणे विक्रीचा परवाना हवा असेल तर त्यासाठीची फी 1000 रुपये एवढी असते.

अर्ज करत असताना काही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असावी लागतात त्यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, गाव नमुना 8, ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र अशा प्रकारे कागदपत्रांची आवश्यकता असते. अर्जदाराकडे इत्यादी कागदपत्रे उपलब्ध असावी. जवळपास एक महिन्याच्या कालावधीने संपूर्ण प्रक्रिया झाल्या नंतर परवानगी देण्यात येते.

Krushi Kendra Licence: कृषी केंद्र सुरू करण्यासाठी परवाना कसा काढायचा? कृषी सेवा केंद्र लायसन्स प्रक्रिया

परवाना मिळविण्यासाठी अर्ज कसा करायचा? कागदपत्रे, पात्रता या बद्दल संपूर्ण माहिती येथे पहा 

 

उमेदवारांसाठी महत्वाची बातमी, एसएससी भरती परीक्षा पंधरा भाषेमध्ये देता येणार

Leave a Comment