राज्यामध्ये पंधरा दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा हाजीर झालेला आहे, राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे, मागील पंधरा दिवसांपासून दडी मारल्या कारणाने, शेती पिकाला पावसाची गरज भासत होती, त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. शेतीमालाला जीवनदान देणारा पाऊस राज्यात चालू झालेला आहे. काही भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
यावर्षी मानसून उशिरा दाखल झाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा उशिरा झालेल्या आहे, परंतु मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये अपेक्षित एवढा पाऊस आतापर्यंत झालेला नाही, त्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे अगदी कळकळीने पावसाची वाट शेतकरी बघत आहे.
या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
राज्यातील पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये मुसळधारते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामध्ये गोंदिया, चंद्रपूर,भंडारा,गडचिरोली व नागपूर या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार आहे.
बंगालच्या उपसागराच्या वायव्येला व शेजारच्या भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र विस्तारलेले आहे व त्यामुळे मध्यप्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच यवतमाळ,वाशिम, अकोला या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
कर्नाटकच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, व या कारणामुळे धाराशिव, नांदेड, लातूर, सोलापूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग व मराठवाड्यातील बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर, जालना, छत्रपती संभाजी नगर, व खानदेशातील जळगाव व धुळे या भागांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. काही भागांमध्ये मध्यम ते काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पुणे,नाशिक, सातारा, सांगली,कोल्हापूर या भागांमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, त्यामुळे एकंदरीत राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तसेच कोकण किनारपट्टीवर सुद्धा हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
उमेदवारांसाठी महत्वाची बातमी, एसएससी भरती परीक्षा पंधरा भाषेमध्ये देता येणार