Goat Farming Scheme : शेळी मेंढी पालन योजना,अनुदान व अर्ज प्रक्रिया

ग्रामीण भागांमध्ये उत्कृष्ट मानला जाणारा व्यवसाय म्हणजे शेळी मेंढी पालन आहे, तसेच शेतीला पूरक धंदा म्हणून सुद्धा शेळी मेंढी पालन हा व्यवसाय केला जातो, या अंतर्गत अनुदान दिले जाते व त्यामधून नागरिक शेळी पालन करू शकतात, तसेच जर मोठा व्यवसाय करायचा असेल त्यामध्ये बंदिस्त शेळी पालन, व यासंबंधीची संपूर्ण माहिती नागरिकांना माहीत असायला हवी, तसेच शेळी मेंढी पालन अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते

शेळीपालन व्यवसाय चालू करण्यासाठी अनुदान दिले जाते का? अशा प्रकारचे प्रश्न नागरिकांना पडतात तर, साधारणता शंभर पासून ते 500 पर्यंत अनुदान दिले जाते, मोठा व्यवसाय नागरिक करू शकतात. व यासाठी राष्ट्रीय कृषिधन विकास अभियान सुधारित याला मंजुरी देण्यात आलेली आहे व यासंबंधीचा जीआर काढण्यात आलेला आहे, व याच्या अंतर्गत शेळी मेंढी पालन अनुदान योजना राबवली जाते.

 

कुणाला अर्ज करता येतो?

राष्ट्रीय कृषिधन विकास अभियान सुधारित अंतर्गत शेळी मेंढी पालन या मुख्य योजना राबवल्या जातात, यामध्ये वैयक्तिक अर्जदार अर्ज करू शकतो. शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता गट, तसेच इतरही अर्ज करू शकतात, या योजने अंतर्गत शंभर शेळी साठी पाच बोकड, अशाप्रकारे 500 शेळ्या 25 बोकड अशाप्रकारे अर्ज करता येतो. यामध्ये अनुदानाचे प्रमाण हे दहा लाख वीस लाख, 50 लाख अशा प्रकारचा प्रकल्प खर्च केला जातो.

प्रकल्प अनुदान बँकेचे कर्ज पास झाल्यानंतर प्रकल्प उभा करत असताना 50% रक्कम दिली जाते तर उर्वरित रक्कम प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अनुदानाच्या 50 टक्के एवढी दिली जाते, जर एखाद्याला स्वतःच्या माध्यमातून गुंतवणूक करायची असेल बँकेच्या मार्फत कर्ज घ्यायचे नसेल तर त्याला 25 टक्के गुंतवणूक करून प्रकल्पाची शाहनिशा करून 50 टक्के तर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पन्नास टक्के अनुदान दिले जाते.

 

अर्ज प्रक्रिया

 

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम खालील वेबसाईट ओपन करा. https://nlm.udyamimitra.in/
  •  लॉगिन करा त्यानंतर तुम्ही जो अर्ज करणार आहे, त्यामध्ये ऑप्शन निवडा मोबाईल क्रमांक टाका त्याच मोबाईल क्रमांक वर आलेला ओटीपी दिलेल्या बॉक्स मध्ये टाका.
  • त्यानंतर तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करत आहात त्यामध्ये शेळी पालन आहे की मेंढी पालन अशाप्रकारे कोणतेही एक ऑप्शन निवडा.
  • त्यानंतर विचारली गेलेले संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा. त्यानंतर बँकेविषयी संपूर्ण माहिती विचारली असेल त्यामध्ये बँकेची माहिती योग्य प्रकारे भरा.
  • माहिती भरल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावे लागेल.
  • सर्वात महत्वपूर्ण कागदपत्र अपलोड करायची म्हणजे प्रकल्पाचा प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करावा लागेल. तसेच संपूर्ण कागदपत्रे अपलोड करायची त्या ठिकाणी दाखवण्यात येईल त्या कागदपत्रासमोर येस असे ऑप्शन निवडा.
  • सर्व कागदपत्रे अपलोड करा, सर्व दिलेली माहिती योग्य आहे अशा प्रकारे ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा व सबमिट बटन वर क्लिक करा, अशा प्रकारे शेळीपालन,मेंढी पालन, वराह पालन, कुक्कुटपालन योजनेचा अर्ज अशाप्रकारे करावा लागतो.

Goat Farming Scheme : शेळी मेंढी पालन योजना,अनुदान व अर्ज प्रक्रिया

मध केंद्र चालू करायचे आहे?मध केंद्र योजना, अर्ज सुरू

अर्ज कसा करायचा? या संदर्भातील व्हिडिओ येथे पहा 

Leave a Comment

error: Content is protected !!
WhatsApp Icon