Gharkul Yojana: या लाभार्थ्यांची नवीन घरकुल यादी आली, निधी मंजूर

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राज्यामध्ये राबवण्यास 24 जानेवारी 2018 मधील शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली होती, एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे, राज्यामध्ये भटक्या,विमुक्त जातीतील प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राज्यांमध्ये राबविण्यात येते. व लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले होते व, विविध जिल्हानुसार लक्षांक सुद्धा देण्यात आलेले होते.

21 जुलै 2023 ला एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे, त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, धाराशिव जिल्ह्यातील एकूण 1057 पात्र घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे व त्यानुसार प्रतिव्यक्ती 1 लाख 20 हजार रुपये, याप्रमाणे निधी 12 कोटी 68 हजार रुपये, प्रशासकीय निधी 4800 प्रति लाभार्थी, 50 लाख 73 हजार रुपये, असे सर्व मिळून 13 कोटी 19 लाख 13 हजार 600 रूपये एवढ्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे.

चव्हाण चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना अंतर्गत सर्व लाभार्थी, विजा भज जात प्रमाणपत्र धारक असून अशा व्यक्तींना योजने अंतर्गत लाभ दिला जाणार आहे, तसेच सर्व लाभार्थ्यांना 21 तारखेपासून ते पुढील एक महिन्याच्या कालावधीमध्ये अधीवास प्रमाणपत्र सादर करावे लागेल, तसेच उत्पन्नाचा दाखला सुद्धा सादर करणे बंधनकारक आहे.

धाराशिव जिल्ह्यातील एकूण 1057 लाभार्थ्यांना पात्र ठरवण्यात आलेले असून यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी यांचा समावेश आहे निधी पैकी 2 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. अशा प्रकाररे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.

Gharkul Yojana: या लाभार्थ्यांची नवीन घरकुल यादी आली, निधी मंजूर

कृषी केंद्र सुरू करण्यासाठी परवाना कसा काढायचा? कृषी सेवा केंद्र लायसन्स प्रक्रिया

निवड झालेल्या लाभार्थ्यांची घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
WhatsApp Icon