Cotton Prices : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कापसाच्या दरात तब्बल एवढ्या रुपयांची वाढ, कापसाचे दर अजूनही वाढण्याची शक्यता

मागील आठवड्यापासून कापसाच्या दरामध्ये सुधारणा होत आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापसाची साठवणूक केलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी कापुस दरात सुधारणा होणे ही बातमी अत्यंत आनंददायक आहे, अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केलेली आहे परंतु अगदी बोटावर मोजण्या इतके शेतकरी कापसाची साठवणूक करून आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा कापसाची मागणी वाढत चाललेली आहे त्यामुळे कापसाच्या दरामध्ये सुधारणा होत आहे.

कापूस अभ्यासकांनी कापसाच्या दरवाढी बद्दल काय विचार व्यक्त केलेला आहे तसेच कापसाचे दर पुढील काळात वाढतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना नक्कीच पडलेला असेल. राज्यामध्ये कापसाला साधारणतः6700 ते 7300 एवढ्या भाव मिळाला तर मागील काळामध्ये कापसाच्या दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण बघायला मिळालेली होती व त्या काळामध्ये कापसाचे भाव वाढणार नाही या अंदाजाने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला.

कापूस दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाची मागणी वाढलेली असून चीनमध्ये कापसाला मागणी आहे तसेच स्टॉक मध्ये असलेला कापूस चीनकडून विक्री करणे चालू असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव वाढलेले आहे. तसेच देशामध्ये सुद्धा कापडाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने सुताला सुद्धा मागणी वाढलेली असून कापसाच्या दरात सुधारणा होत आहे.

अमेरिकेमध्ये सुद्धा कापूस पिकांवर विपरीत परिणाम पाहायला मिळत असल्यामुळे तसेच त्या ठिकाणी उष्णतेचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्याने कापसाला होणारी मागणी वाढलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 7500 एवढा भाव कापसाला मिळत आहे, परंतु दरवर्षी 4 हजार गाठींची आवक ऑगस्ट महिन्यामध्ये होत असते त्या ऐवजी यावर्षी अठरा हजार गाठीची आवक होत आहे कापूस अभ्यासांच्या मते कापसाच्या दरामध्ये अजूनही चार-पाचशे रुपयांमध्ये वाढवण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

Cotton Prices : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कापसाच्या दरात तब्बल एवढ्या रुपयांची वाढ, कापसाचे दर अजूनही वाढण्याची शक्यता

ऑगस्ट महिन्यात पावसाळा जोर कसा राहील? हा हवामानाचा अंदाज लक्षात घ्या

Leave a Comment