Orders Given To Banks: सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्ज वसुली ची सक्ती न करण्याच्या दिल्या बँकांना सूचना

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे व त्यामध्ये बँकांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे, व यात सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी आहे, बँकां अंतर्गत कर्ज वसुली करताना नागरिकांना धमकावले जाते तसेच वारंवार फोन लावून विचारणे कारवाईच्या धमकी देणे अशा प्रकारे अनेक प्रकारच्या घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. व याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या घोषणेनुसार अशा प्रकारच्या घटना टाळण्यास मदत होणार आहे.

बँकांकडून कर्जदार व्यक्तींना कर्ज न फेडल्यास, किंवा कर्ज फेडण्यास उशीर झाल्यास, अनेक प्रकारे त्रास दिला जातो यामुळे नागरिक चिंतेत होतात, बँकांच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकाला कर्ज फेडण्यासाठी दबावाखाली आणले जाते, व अशा प्रकारची प्रकरने निर्मला सीतारामन यांच्याकडे आल्याची माहिती त्यांनी दिली, अशा प्रकरणाला आळा घालण्याच्या उद्देशाने त्यांनी काही सूचना दिलेले आहे.

आरबीआय अंतर्गत काही सूचना देण्यात आलेल्या असून तरीसुद्धा काही बँका या सूचनांचे पालन करत नाही, चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुली करतात परंतु यापुढे बँकांना सूचनांचे पालन करावेच लागणार आहे, कर्ज वसुली करताना सरकारी अथवा खाजगी कोणतीही बँक असली तरी सुद्धा सूचनांचे पालन करूनच जबरदस्ती न करता कर्ज वसुली करावी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना कर्ज वसुलीसाठी वारंवार त्रास देऊ नये असे सुविधा सांगण्यात आले. बँका नंबर यादी मध्ये राहून सूचनाचे पालन करून काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.

कर्ज वसुली बाबत काही आरबीआयची मार्गदर्शक तत्वे आहेत त्यानुसारच बँकेला सूचनांचे पालन करावे लागेल, त्यामध्ये कर्ज वसुली करताना एजंट ग्राहकाला ठराविक वेळेमध्ये कॉल करू शकतो त्यामध्ये वेळही सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ची असेल.

 

आरबीआयच्या सूचना

  • ज्या ठिकाणी एजंटला ग्राहक भेटण्यासाठी बोलावेल त्याच एजंट ला ग्राहकाला भेटावे लागेल.
  • ज्यावेळेस एजंट ग्राहकाला भेटतो त्यावेळेस जर ग्राहकाने एजंटला ओळखपत्र दाखवा असे म्हटल्यास ओळखपत्र दाखवावे लागेल.
  • तसेच ग्राहकाचा मानसिक व शारीरिक छळ बँकेला करता येणार नाही.
  • जर बँकांनी सूचनांचे पालन केले नाही व नागरिकांसोबत वाईट रित्या वागणे अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या तर मात्र नागरिक थेट आरबीआय कडे तक्रार करू शकणार आहेत.

Orders Given To Banks: सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्ज वसुली ची सक्ती न करण्याच्या दिल्या बँकांना सूचना

काय आहे मृदा आरोग्य कार्ड? शेतकऱ्यांना कसा होतो फायदा? जाणून घ्या सविस्तर

Leave a Comment