अनेक शेतकऱ्यांचा जवळ कापसाचे भाव वाढतील या कारणाने शेतकऱ्यांनी कापूस साठवलेला होता, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आवक ही कापसाचे मागील काही काळामध्ये खूप जास्त प्रमाणात होती, व कापसाची आवक जास्त प्रमाणात असल्यामुळे काही दिवसांपासून कापसाच्या दराने निचांक पातळी गाठलेली होती, त्याचबरोबर अजूनही काही शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलेला आहे. शेतकऱ्यांच्या घरीच कापूस साठवून ठेवलेला असताना शेतकऱ्यांना मात्र कापसाच्या दरामध्ये सुधारणा होईल की नाही या कारणाने चिंता वाटत होती. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये Cotton Price मध्ये चांगल्या प्रमाणात सुधारणा पाहायला मिळत आहे.
गेल्या तीन ते चार दिवसापासून कापसाच्या दरामध्ये चांगल्या प्रमाणात सुधारणा होत असताना दिसत आहे, मागील पंधरा ते वीस दिवसाच्या भावाच्या तुलनेत बघितले असता कापसाचे भाव वाढलेले दिसत आहेत, त्याचप्रमाणे अजूनही कापसाचे दर वाढेल का याबद्दल शेतकरी अशा धरून बसलेले आहे. त्याचप्रमाणे कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात व देशांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते कापसाची आवक कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तसेच देशांमध्ये कापसाच्या दरामध्ये चांगल्या प्रमाणात सुधारणा पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे कापसाची आवक दिवसेंदिवस आणखी नाही कमी होऊन गेली तर मात्र cotton price मध्ये चांगल्या प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता अभ्यासकांनी मांडलेली आहे.
कापसाच्या दरामध्ये सुधारणा
कापसाचे दर बघितले असता 200 ते 400 रुपये दर सध्या 2 दिवसाच्या कालावधीत वाढलेली आहे, त्याचप्रमाणे मानवत बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला तर हा 6000 ते 7415 रुपये एवढा मिळालेला होता, त्याचप्रमाणे सेलू बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला भाव हा 6250 रुपये ते 7410 रुपये एवढा होता. अर्थातच सहा हजार ते सहा हजाराच्या वर त्याचप्रमाणे 74 पर्यंत कापूस येऊन पोहोचलेला आहे व ही बातमी शेतकऱ्यांसाठी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी कापसाची अजून पर्यंत साठवणूक केलेली आहे असे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
सध्या कापसाला मिळणारा दर Cotton market price:
सध्या राज्यात कापसाला 6900 ते 7400 पर्यंत दर मिळत आहे. कापसाच्या बाजार भावात गेल्या 4 ते 5 दिवसात चांगली वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे कापूस घरात शिल्लक असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी मिळत आहे.