Business Idea: शेती करत असताना शेती सोबत करा हे 3 जोडधंदे; कमवा लाखो रुपये, ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठी मागणी

शेतकरी बांधवांना आपला देश हा प्राथमिक स्तरावरील उत्पन्नावर जास्त अवलंबून आहे. आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हटले जाते आपल्या देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही कृषी या व्यवसायावर आधारित आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला माहित आहे का तुला देश कृषीप्रधान असला तरीसुद्धा 95 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेत जमीन आहे. त्यामुळे जर या शेतकऱ्यांना लवकरात लवकर समृद्ध व्हायचे असेल म्हणजेच शेती व्यवसायातून स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर केवळ शेतीवर अवलंबून राहता येत नाही.

 

त्यामुळे या शेतकरी बांधवांना शेती करत असताना शेती बरोबरच काही जोडधंदे करावे लागतात. आणि खेड्यापाड्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे तुम्हाला पशुपालन या जोड व्यवसायातील शेळ्या मेंढ्या किंवा गाई म्हशी दिसते. शेतकऱ्यांना जोडधंद्यामधून ठराविक उत्पन्न मिळते ज्याच्या माध्यमातून शेतकरी आपला घर खर्च भागवत शेतीतील उत्पन्न शिल्लक ठेवू शकतात.

 

आपल्या देशातील अनेक नागरिकांचा शेतीवर उदरनिर्वाह होत असल्यामुळे तसेच दिवसान दिवस शेतीवर होणारा खर्च तसेच महागाई वाढत असल्यामुळे आणि निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून फारसा उत्पन्न मिळत नाही त्यामुळे जर शेतकऱ्याकडे जर जोडधंदा असला तर अशा परिस्थितीत आर्थिक संकटाच्या वेळेस जोडधंदा त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करतो. त्यामुळे आजच्या या लेखात आपण शेती करत असताना करता येईल असे काही महत्त्वाचे जोडधंदे पाहणार आहोत.

 

 

शेती सोबत करता येईल असे जोडधंदे:

 

शेती करत असताना आपल्याला खालील तीन महत्त्वाचे जोडधंदे करता येतात.

 

1. पशुपालन व्यवसाय मधून डेअरी फार्म Dairy farming business:

शेतकरी बांधवांनो ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे पशुधन असते आणि या पशुधनाचा पालन करून हे शेतकरी थोडाफार प्रमाणात पैसा कमवतात. परंतु जर तुम्ही हे पशुपालन थोड्या मोठ्या प्रमाणात केले. तुम्हाला या पशुपालन व्यवसाय मधून डेअरी फार्म सुरू करता येतो. जर आपण आपल्या डेअरीमध्ये दुधाची क्वालिटी चांगली ठेवली तर खेडेगावांमध्ये या व्यवसायाला मोठा स्कोप आहे. दिवसेंदिवस दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढत असून अनेक गावांमध्ये सध्या डेअरी पोहोचला नाही, परंतु अशा वेळेस आपण हा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा करून घेता येतो.

 

2. कुक्कुट पालन व्यवसाय Poultry Farming Business:

शेतीवर आधारित हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे आपल्या भारत देशामध्ये मास आणि अंडे यांना प्रचंड मागणी आहे. जर आपण आपल्या खेडेगावांमध्ये पोल्ट्री फार्म म्हणजेच कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू केला तर यामध्ये मोठा स्कोप आहे. कुकुट पालना मध्ये कोंबड्यांना आणि त्यांच्या अंड्यांना वर्षभर मागणी असते. त्यामुळे या व्यवसायामध्ये कधीच चढ-उतार मोठ्या प्रमाणात येत नाही. सुरुवातीला आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय छोट्या प्रमाणात कुक्कुट पक्षी कमी पाळून सुरू करू शकतो. नंतर व्यवसायाची ग्रोथ टप्प्याटप्प्याने करू शकतो.

 

3. पीठ गिरणी व्यवसाय Flour Mill Business:

खेडेगावामध्ये आता सुद्धा गहू आणि तांदूळ दळण्यासाठी पीठ गिरणी मध्ये नेले जाते. परंतु जर आपण हा व्यवसाय केवळ गावपुरा आता मर्यादित न ठेवता पीठ गिरणीवरून गहू तसेच डाळी किंवा त्याचबरोबर इतर पदार्थ शहरांमध्ये पॅकिंग करून घेतले तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाकडे पीठ गिरणीवर जाऊन पीठ दळण्यासाठी वेळ असतो परंतु शहरी भागातील व्यक्ती वेळ वायांना घालवता रेडीमेड पिठाची बॅग तसेच डाळींचे पॅकेट त्याचबरोबर इतर वस्तू खरेदी करतात.

 

त्यामुळे जर आपण हा व्यवसाय थोडा वेगळ्या पद्धतीने शहरी भागामध्ये सुरू केला तर याचा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा मिळून घेता येतो.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, 1 लाख रु ते 1 कोटी रु पर्यंत प्रोत्साहन, असा करा अर्ज, जाणून घ्या अटी व पात्रता | PMFME Scheme 2023

राज्य तसेच केंद्र शासन नवनवीन उद्योगांना चालना देण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देते. त्यामुळे तुम्ही महामंडळाच्या कोणत्याही कर्ज योजना अंतर्गत किंवा केंद्र शासनाच्या मुद्रा योजना अंतर्गत नवीन व्यवसायासाठी कर्ज मिळू शकतात.

Ayushman Card: 5 लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार मिळवून देणारे हे कार्ड तुम्ही काढले का? नसेल तर, लगेच हे आयुष्यमान कार्ड काढा

Leave a Comment

WhatsApp Icon