दहावी व बारावीच्या परीक्षेत शाळेतून पहिला नंबर आला! हा फॉर्म भरा आणि मिळवा 10 हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस | Scholarship for Students

विद्यार्थी मित्रांनो शासनाच्या अशा अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप असतात ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करत असतात तसेच त्यांना पुढील शिक्षण मिळवण्यासाठी संधी उपलब्ध करून देत असतात. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अशी स्कॉलरशिप सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असून ती स्कॉलरशिप काय आहे, स्कॉलरशिप अंतर्गत कोण अर्ज करू शकतो अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड आणि पात्रता या Scholarship for Students संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

कोणत्याही विद्यार्थ्यांचा पुढील भवितव्य आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा वरूनच ठरत असते. एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातील इयत्ता दहावी हा महत्त्वाचा कलावधी देणारा क्षण असतो. त्यामुळे जर एखादा विद्यार्थी दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत पहिला नंबर आणत असेल तर नक्कीच त्या विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्यामध्ये एखाद्या मोठ्या पदावर जायचे आहे किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी आपलं करियर बनवायचं असते.

 

त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना वेळोवेळी शासनाच्या विविध संस्थांवरील किंवा शासनाद्वारे स्कॉलरशिप देण्यात येते जेणेकरून पुढील भविष्यामध्ये त्यांना स्कॉलरशिप मिळवून चांगले शिक्षण मिळवता येईल.

 

 

विद्यार्थ्यांना कोणत्या स्कॉलरशिप अंतर्गत मिळणार 10 हजार? 10th and 12th Scholarship Yojana?

राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचा दहावी किंवा बारावीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना या पुरस्कारांतर्गत दहा हजार रुपये मिळणार आहे.

त्या संदर्भातील यादी ही संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी सादर करायची आहे. Rajashri Shahu Maharaj Gunavatta Puraskar अंतर्गत मुख्याध्यापक हे यादी सदर करतील.

 

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळेल दहा हजार?

जे विद्यार्थी अनुसूचित जमाती तसेच अनुसूचित जाती त्याच बरोबर विशेष मागास प्रवर्गातील आहेत अशा विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे हे विद्यार्थी दहा हजार रुपये स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्र आहेत.

 

स्कॉलरशिप कशी मिळेल?

समाज कल्याण विभाग नागपूर यांच्यामार्फत हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव हे समाज कल्याण विभाग नागपूर यांच्याकडे सादर करायचे आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त श्रद्धानंद पेठ नागपूर येथे संपर्क करू शकतात.

 

मिलिटरी भरतीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग आणि 10,000 रु महिना, या योजने अंतर्गत आत्ताच अर्ज करा | Military Bharti Traning 2023

विद्यार्थी मित्रांनो शाळा तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून ही यादी संबंधित समाज कल्याण विभागाला पाठवण्यात येणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेले आहे असे विद्यार्थी या स्कॉलरशिप अंतर्गत लाभ मिळवू शकणार आहे.

महत्वाची बातमी, देशात लवकरच समान नागरी कायदा लवकरच लागू होणार, या राज्यात सर्वात प्रथम लागू होणार | Uniform Civil Code

Leave a Comment