Nuksan Bharpai: या 14 जिल्ह्यातील 26.50 लाख शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रु मंजूर, सततचा पाऊस अनुदान वाटपास मंजुरी, GR आला

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सततच्या पावसामुळे नुकसान झालेले लाखो शेतकरी गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून सततच्या पावसाचा अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यामध्ये सन 2022-23 मध्ये मोठ्या प्रमाणात सततचा पाऊस झाला होता. या सततच्या पावसामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झालेले होते. राज्य शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे वाटप करण्यासाठी निधी देण्याची घोषणा केलेली होती. तसेच यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप(Nuksan Bharpai) करण्यासाठी पंधराशे कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली होती.

 

परंतु या पैसे वाटप संदर्भात शासन निर्णय जाहीर झाला नव्हता त्यामुळे ते पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, किती रुपये मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांना हे पैसे कधी मिळतील केव्हा मिळतील असा प्रश्न निर्माण झालेला. परंतु आता या Nuksan Bharpai संदर्भात अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे.

 

1500 कोटी वाटपाचा शासन निर्णय जाहीर Nuksan Bharpai GR:

राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे नुकसान झालेले आहे त्यासाठी nuksan bharpai चे पैसे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पंधराशे कोटी रुपये नुकसान भरपाई वाटपासाठी शासन निर्णय दिनांक २० जून 2023 रोजी जारी केलेला आहे.

 

सतत च्या पावसाचा नैसर्गिक आपत्ती म्हणून समावेश:

यापूर्वी जर Satat Paus मुळे शेतकऱ्यांची नुकसान झाले असते तर ते नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरण्यात येत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे मिळता येत नव्हत. परंतु महाराष्ट्र शासनाने यापूर्वी सततच्या पावसाला नैसर्गिक आपत्तीमध्ये टाकलेले असून आता इथून पुढे सततच्या पावसामुळे कोणत्याही शेतकऱ्यांची नुकसान झाले तर तो Shetkari Nuksan Bharpai मिळण्यासाठी पात्र असेल.

 

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ही रक्कम:

सतत पाऊस नुकसान भरपाई चे हे पैसे राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये अहमदनगर तसेच अकोला, अमरावती व छत्रपती संभाजी नगर, बीड, बुलढाणा, जळगाव, जालना, नागपूर व नाशिक, धाराशिव, परभणी, सोलापूर आणि वाशिम या 14 जिल्ह्यांचा समावेश आहे.

khatache bhav: रासायनिक खतांचे 2023 चे भाव पहा ऑनलाईन, जाणून घ्या कोणत्या खताचा किती दर आहे, यापेक्षा जास्त किमतीत खते खरेदी करू नका

कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार या संदर्भात माहिती करिता तुम्ही अधिकृत शासन निर्णय वाचावा.

 

1500 कोटी रुपये कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

हेक्टरी किती रुपये मिळणार?

सतत पाऊस Nuksan Bharpai चे पैसे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 8500 रुपये या दराने Nuksan Bharpai Maharashtra मिळणार आहे. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंतचा लाभ मिळेल. म्हणजेच एक शेतकरी जास्तीत जास्त 17 हजार रुपये पर्यंत नुकसान भरपाई मिळवू शकतो.

 

1500 कोटी रुपये कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Ration Home Delivery: शिंदे सरकारचा मोठा निर्णय, आता रेशन धान्य मिळणार घरपोच, रेशन आपल्या दारी योजना!

 

Leave a Comment