NFBS Yojana: नवीन योजना, आता कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मिळेल 20 हजार अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया व पात्रता

मित्रांनो एखाद्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे. आता या योजनेच्या अंतर्गत निराधार झालेल्या कुटुंबांना केंद्र सरकार 20000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. त्यामुळे नेमकं ही योजना काय आहे या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा या संदर्भात विस्तृत माहिती आपण या NFBS Scheme 2023 संदर्भात लेखात जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो घरातील कर्ता व्यक्ती म्हणजे घराचा कणा असतो. त्याकरता व्यक्तीच्या भरोशावर संपूर्ण घर चालत असते त्याची संपूर्ण घराची जबाबदारी तो घेऊन चालत असतो. त्यामुळे जर एखाद्या वेळेस एखाद्या कुटुंबावर वाईट परिस्थिती आली आणि करता व्यक्ती मरण पावला तर त्या कुटुंबाचा आधार नष्ट होतो आणि ते कुटुंब निराधार होते. त्यामुळे अशा परिस्थितीत त्या कुटुंबांना आधार देणे गरजेचे असते त्यामुळे शासनाने थोडाफार प्रमाणात का होईना अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी नवीन योजना सुरू केलेली आहे

 

 

काय आहे ही योजना? What is NFBS Yojana?

घरातील कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबांना वीस हजार रुपये आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वाची योजना म्हणजे ‘नॅशनल फॅमिली बेनिफिट स्किम’ होय. या NFBS योजना अंतर्गत जर घरातील करत्या कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला तर त्याच्यापेक्षा त्याच्या कुटुंबांना या National Family Benifit Scheme अंतर्गत लाभ मिळवता येणार आहे.

 

योजने अंतर्गत 20 हजार अर्थसाह्य मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा?

या योजने करिता तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने जिल्हा समाज कल्याण विभाग यांच्याकडे अर्ज करावा लागेल. समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे तुम्ही विहित नमुन्यातील अर्ज आवश्‍यक ती कागदपत्रे जोडून जमा करू शकतात.

योजनेअंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे त्या लिंक वर क्लिक करून तो अर्ज तुम्ही डाऊनलोड करू शकता.

 

अर्ज pdf पहा

 

 

लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Required Documents For NFBS?

मित्रांनो जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असायला पाहिजे.

1. आधार कार्ड

2. पॅन कार्ड असल्यास

3. बँक अकाउंट

4. मोबाईल क्रमांक

5. कुटुंबप्रमुखाचा वया बाबत पुरावा

6. पासपोर्ट साईजचे अर्जदाराचे फोटो

7. रेशन कार्ड

 

या व्यतिरिक्त काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे तुम्हाला पाहिजे असल्यास समाज कल्याण विभागाकडून तुम्ही माहिती मिळवू शकतात.

 

Monsoon 2023 Update: शेतकऱ्यांनो सावधान मान्सून संदर्भात मोठी बातमी, यंदा मान्सून उशिरा, बळीराजाच्या चिंतेत वाढ

 

लाभ मिळण्यासाठी आवश्यक पात्रता:

1. योजनेअंतर्गत केवळ भारताचा रहिवासी असणारे व्यक्तीच अर्ज करू शकतात.

2. योजनेअंतर्गत केवळ दारिद्र रेषेखालील कुटुंबे अर्ज करू शकतात.

3. अर्ज हा केवळ त्या व्यक्तीच्या वारसदारांनाच करता येणार आहे.

 

अशाप्रकारे आपण एका महत्त्वपूर्ण अशा केंद्रशासनाच्या योजने संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे ही योजना अतिशय महत्त्वाची असते ही महत्त्वाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.

Perni Anudan: खुशखबर, शेतकरी बांधवांनो आता पेरणीसाठी 10 हजार अनुदान, या शेतकऱ्यांना मिळेल, पहा कसा मिळेल लाभ

Leave a Comment