Namo Shetkari Yojana: अखेर नमो शेतकरी योजनेचा GR आला, शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार, फक्त या शेतकऱ्यांना मिळेल लाभ

मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना च्या प्रमाणे राज्य शासनाच्या मार्फत सुद्धा मदत व्हावी यासाठी राज्याच्या 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु आतापर्यंत या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय प्रकाशित झालेल्या नव्हता त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही परिणामी लाभ मिळवता आला नाही परंतु आता महाराष्ट्र शासनाने Namo Shetkari Yojana चा शासन निर्णय म्हणजे जीआर प्रकाशित केलेला असून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या प्रकाशित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार योजनेचे अंमलबजावणी कशा पद्धतीने असेल योजनेअंतर्गत कोणते namo shetkari समाविष्ट असतील तसेच अटी व शर्ती आणि पात्रता या सर्व बाबी नमूद करण्यात आलेला आहे.

 

 

योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी कोणते शेतकरी आहेत पात्र?

नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना या namo shetkari mahasanman nidhi yojana साठी जशास तशा लागू करण्यात आलेल्या आहेत.

1. पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणी केलेली शेतकरी आणि लाभ मिळत असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे.

2. केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व शेतकरी राज्याच्या नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतील.

3. केंद्र शासनाने योजनेच्या निकषात केलेल्या बदलाचा परिणाम या योजनेवर होणार असून जे निकष पी एम किसान साठी आहे, तेच निकष या ठिकाणी लावण्यात येणार आहे, त्यामुळे पी एम किसान योजनेत बसणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.

4. पीएम योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करून लाभ मिळणारे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील.

5. पी एम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासाठी राज्यातील जेवढे शेतकरी पात्र असतील ते सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतील.

6. पी एम किसान योजनेच्या हप्ता वितरित झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे

 

नमो शेतकरी योजनेचे पोर्टल विकसित होणार:

राज्यात नमो शेतकरी योजनेची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत namo shetkari योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिलेल्या असून लवकरच योजने संदर्भात पोर्टल तयार होणार आहे.

 

नमो शेतकरी योजनेची हप्ते कशे मिळणार:

नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून पहिला हप्ता हा दरवर्षी एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये जमा करण्यात होईल. योजनेअंतर्गत दुसरा हप्ता हा ऑगस्ट नोव्हेंबर या महिन्यांमध्ये जमा करण्यात येईल तर तिसरा हप्ता हा डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये जमा होईल.

Nuksan Bharpai: शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अतिवृष्टी नुकसानीसाठी अखेर 401 कोटी रु मंजूर, या शेतकऱ्यांना मिळेल पैसे

योजनेचा शासन निर्णय पहा:

नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा शासन निर्णय संपूर्णपणे पाहून वाचून तुम्ही योजना संदर्भात अधिक माहिती मिळवू शकतात. शासन निर्णय डाऊनलोड करण्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.

 

नमो शेतकरी सन्मान योजना शासन निर्णय येथे पहा

 

MSP 2023: ब्रेकिंग न्युज, खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता एवढा मिळेल पिकांना शासकीय दर

Leave a Comment