khatache bhav: रासायनिक खतांचे 2023 चे भाव पहा ऑनलाईन, जाणून घ्या कोणत्या खताचा किती दर आहे, यापेक्षा जास्त किमतीत खते खरेदी करू नका

शेतकरी बांधवांनो पेरणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकरी बांधवांना बियाणे औषधे तसेच खतांची मोठ्या प्रमाणावर आवश्यक असते. बियाणे हे कमी प्रमाणात लागतात परंतु खत शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात टाकावे लागते त्यामुळे हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक वेळा तांत्रिक अडचणी किंवा खतांचा पुरवठा कमी असणे अशा प्रकारची अनेक कारणे सांगून शेतकऱ्यांना जास्त दराने खताची विक्री करण्यात येते. परंतु मित्रांनो शासनाच्या नियमानुसार खताचे दर khatache bhav ठरवून देण्यात आलेले असतात.

 

तसेच खतांच्या एकूण किमतीवर शासन सबसिडी सुद्धा देत असते. त्यामुळे जर तुमच्या भागामध्ये जास्त दराने खताची विक्री होत असेल तर आपण खतांची सध्या सुरू असलेले तर चेक करून त्याबाबत कृषी विभागाकडे तक्रार देखील नोंदवू शकतात. त्याकरिता आपल्याला सध्या असलेले खतांचे दर माहीत असणे आवश्यक असते. सर्व शेतकरी बांधवांना fertilizer Rates दर ऑनलाईन घरबसल्या पाहता यावे याकरिता नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून आता आपण खतांच्या किमती ऑनलाईन कसे पाहायचे त्या khatache bhav संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

 

शेतकऱ्यांची होणारी फसवणूक काढण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी दुकानदाराकडे कोणत्या व किती खतांचा साठा उपलब्ध आहे आणि किती दराने तो विकल्या जात आहे याची माहिती ठेवायला पाहिजे.

 

आता खतांच्या किमती आणि उपलब्ध साठा पाहता येणार ऑनलाइन:

शेतकरी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सर्व खतांचे दर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येत आहे, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना खतांच्या किमती माहिती व्हाव्या यासाठी शासनाने तशी सुविधा विकसित केलेली आहे.

 

खतांचे दर ऑनलाईन कसे पाहायचे? How to Check Fertilizer Rates Online?

खतांचे दर आणि दुकानांमध्ये उपलब्ध असणारा साठा पाहण्यासाठी तुम्हाला किसान सुविधा नावाच्या वेबसाईटवर जाऊन पाहता येणार आहे. आपण कोणत्याही दुकानातील खतांचे भाव त्या दुकानदाराचे नाव टाकून चेक करू शकतो. खताचे भाव ऑनलाईन कसे पाहायचे त्या संदर्भातील एक व्हिडिओ ची लिंक खाली दिलेली आहे, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील.

 

खताचे भाव ऑनलाईन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MSP 2023: ब्रेकिंग न्युज, खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता एवढा मिळेल पिकांना शासकीय दर

खताचे भाव ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ स्वरूपात ती पाहून ऐकून त्यानुसार भाव चेक करू शकतात.

Nuksan Bharpai: शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अतिवृष्टी नुकसानीसाठी अखेर 401 कोटी रु मंजूर, या शेतकऱ्यांना मिळेल पैसे

Leave a Comment