Jamin Vatani Patra: 100 रुपयात करा शेत जमिनीची वाटणी, विशेष मोहीम सुरू, असा करा अर्ज

मित्रांनो अनेक वेळा शेतकरी बांधवांकडून शंभर रुपयात जमीन वाटणी होते का या संदर्भात प्रश्न विचारण्यात येते, शंभर रुपयांमध्ये खरोखर जमीन नावावर होते का? आणि जर शंभर रुपयांमध्ये जमीन नावावर होत असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, त्याला कोणता आधार आहे. कोणती जमीन शंभर रुपयांमध्ये नावावर होती कोणती होत नाही यासंदर्भात अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतात त्यामुळे या लेखात आपण शंभर रुपयात शेत जमिनीची वाटणी कशी करायची या Jamin Vatani Patra संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

 

शेतकरी बांधवांना शंभर रुपयांमध्ये जमीन नावावर होते का हा प्रश्न जर तुम्हाला पडलेला असेल तर या लेखात तुम्हाला शंभर रुपयात जमीन नावावर करण्यासंदर्भात जेवढे ही प्रश्न असतील त्यांची उत्तरे मिळतील. शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका आहेत, ज्याचं अचूक उत्तर तुम्हाला या लेखात मिळेल.

 

कोणती जमीन 100 रुपयात वाटणी करता येते?

शेतकरी बांधवांना वडिलोपार्जित जमिनीचे आपण शंभर रुपयांमध्ये वाटणी पत्र करू शकतो. तुम्हाला शंभर रुपयांमध्ये कोणतेही नवीन जमिनीची खरेदी करता येत नाही, किंवा नवीन जमीन शंभर रुपयात तुम्ही नावाने करू शकत नाही. केवळ वडिलोपार्जित जमीन मधून विभागणी आपल्याला 100 रुपयात करता येते.

 

100 रुपयात जमिनीचे वाटणी करण्यासंदर्भात शासन निर्णय आहे का?

शेतकरी मित्रांनो शंभर रुपयांमध्ये शेत जमिनीची वाटणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय म्हणजे जीआर प्रसिद्ध आहे. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे कोणत्या प्रकारची जमीन आपण नावावर करू शकतो आणि कोणत्या प्रकारची करू शकत नाही.

परंतु शेतकऱ्यांना Jamin Vatani Patra संदर्भातील कायदे किंवा तरतुदी तसेच शासनाचे निर्णय माहित नसतात त्यामुळे शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा मिळवता येत नाही.

 

कोणत्या कायद्याद्वारे शंभर रुपयात जमिनीची वाटणी होईल?

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल अधिनियमाच्या कलम 85 नुसार तलाठी यांच्याकडे अर्ज करून आपण शेत जमिनीचे वाटणी पात्र करू शकतो. किंवा दुय्यम निबंधकाकडे अर्ज करून तुम्ही शेत जमिनीची वाटणी करू शकता. परंतु यापैकी सर्वात स्वस्त आणि सोपा पर्याय म्हणजे कलम 85 नुसार तलाठी यांच्याकडे शेत जमिनीच्या वाटणी पत्राचा अर्ज करणे.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

शंभर रुपयात जमीन वाटणी कशी करायची? Land Registration in 100 rs

शेतकरी बांधवांनी शंभर रुपयांमध्ये जमिनीचे वाटणी पत्र करण्यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तसेच त्या संदर्भात असणारा अर्जाचा नमुना पाहण्यासाठी खालील तुम्हाला व्हिडिओची लिंक दिलेली आहे ते पाहून त्या संदर्भात तुम्ही अर्ज करू शकतात.

 

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

100 रुपयात जमीन वाटणी कशी करायची? या संदर्भातील व्हिडिओ येथे पहा

 

शंभर रुपयात जमिनीचे वाटणी पत्र करण्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती आपण या लेखात जाणून घेतलेली आहे ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच माहिती करिता आमच्या या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment