Aadhaar Update 2023: आधार कार्ड संदर्भात महत्वाचं अपडेट, आजच हे काम करा अथवा आधार कार्ड होईल बंद

मित्रांनो आपल्याकडे प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. आजकाल आधार कार्ड शिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नाही म्हणजेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा असेल किंवा कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करायची असेल किंवा इतर कोणत्याही कायदेशीर कामांकरिता योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येकाकडे adhar card आहे परंतु आधार कार्डचा जसा जसा वापर वाढत आहे त्याचप्रमाणे अनेक हुशार व्यक्ती आधार कार्डचा दुरुपयोग सुद्धा करत आहे.

 

आधार कार्डच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक सुद्धा केल्या जाऊ शकते कारण की आधार कार्ड बँकेसोबत तसेच पॅन कार्ड सोबत आणि प्रत्येक गोष्ट सोबत लिंक आहे.

 

त्यामुळे आधार कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक काढण्यासाठी भारत सरकारने नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्याचा आवाहन केलेला आहे. जसजसे डिजिटल युग वाढत आहे तसेच ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. ऑनलाइन फसवणुकीमध्ये Aadhaar Update 2023 हा एक महत्त्वाचा घटक आहे.

 

खालील काम करा अथवा आधार कार्ड बंद!:

मित्रांनो adhar card जर तुमच्याकडे असेल आणि ते दहा वर्षापेक्षा जुना असेल तर तुम्हाला ते अपडेट करावा लागेल. जर तुम्ही दहा वर्षापासून तुमचा आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर तुम्हाला ते तात्काळ अपडेट करायचा आहे. त्यामुळे तुमचा आधार कार्ड चा नवीन डाटा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडे जातो. तुमच्या अद्यावत माहिती दिल्यामुळे त्याचा गैरवापर कोणालाही करता येत नाही.

 

Aadhaar Update करताना बायोमेट्रिक अपडेट सुद्धा करावे. आधार कार्ड अपडेट करणे संदर्भात महत्त्वाच्या सूचना आधार कार्ड चे अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. आधार कार्ड अपडेट केल्यामुळे सुलभता तसेच अचूकता वाढणार आहे.

 

आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे. आपण जवळच्या आधार कार्ड सेंटरवर जाऊन आधार कार्ड अपडेट करू शकतो किंवा ऑनलाईन खालील प्रमाणे करू शकतो.

 

आधार कार्ड ऑनलाइन अपडेट कसं करायच?

आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने अपडेट करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in या आधार कार्ड विभागाचे अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लॉगिन करण्यासाठी लॉगिन या पर्यावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर त्यासोबत मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून लॉगिन करायचा आहे.

आता तुम्हाला my adhar नावाच्या एका नवीन पेजवर जायचं आहे ज्यामध्ये विविध पर्याय दिसतील त्यापैकी ऑनलाईन अपडेट सर्विस नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.

आता तुम्हाला आधार कार्ड मध्ये तुमचं नाव किंवा तुमची जन्मतारीख तसेच लिंग किंवा पत्ता ऑनलाइन अपडेट करता येते. जर तुम्हाला बायोमेट्रिक आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर तुम्हाला जवळच्या आधार कार्ड सेंटरवर जाऊन ते अपडेट करावा लागेल.

Mahadbt Farmers Lottery: महाडीबीटी शेतकरी योजनांची लॉटरी लागली, तुम्हाला लागली का चेक करा? तात्काळ हे काम करा

शुल्क किती लागेल?

तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फक्त पन्नास रुपये इतके शुल्क द्यावे लागेल. आधार कार्ड अपडेट करण्याची रिक्वेस्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक नंबर प्राप्त होईल तसेच आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर अपडेट झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल.

Jamin Vatani Patra: 100 रुपयात करा शेत जमिनीची वाटणी, विशेष मोहीम सुरू, असा करा अर्ज

Leave a Comment