शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं, आता घरबसल्या करा सातबारा वर वारसाची नोंद, सातबाऱ्यावर घरातील व्यक्तीचे नाव टाका ऑनलाईन | Sarbara Varas Nond

शेतकरी बांधवांना एखाद्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीचा म्हणजेच ज्या व्यक्तीचे नाव शेत जमीन आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याबद्दल त्याच्या वारसदारांना त्याची संपत्ती तसेच जमीन मिळत असते. त्यामुळे शेत जमिनीवर वारसाची नोंद तुम्हाला करावी लागत असते. जर शेत जमिनीवर Sarbara Varas Nond तलाठी कार्यालय मध्ये जाऊन केली तर तुम्हाला ती प्रोसेस अवघड जाईल परंतु आता ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या तुम्ही सातबारावर वारसाची नोंद करू शकतात.

आता सातबारावर वारसाची नोंद करण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नसून ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या अधिकृत वेबसाईट करून सातबारावर घरातील व्यक्तींची Varas Nondani करता येते.

 

ऑनलाइन वारस नोंदणी करण्यासाठी प्रणाली विकसित: Varas Nondani Online Process:

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आता शेतजमिनी संदर्भातील सर्व व्यवहार तसेच सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येत आहे. पूर्वी आपल्याला जर सातबारा हवा असेल तर त्याकरिता आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये चक्र माराव्या लागत होत्या परंतु आता डिजिटल सातबारा आल्यानंतर तुम्हाला घरबसल्या तो सातबारा कोणत्याही शासकीय कामासाठी वापरता येत आहे.

 

आता राज्यातील जमीन धारकांना म्हणजे शेतकऱ्यांना शेती संदर्भातील सर्व नोंदी तसेच सर्व बाबी ऑनलाईन पद्धतीने करता यावे यासाठी राज्य शासनाने इ हक्क प्रणाली विकसित केलेली आहे. याही हक्क प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला अनेक प्रकारच्या बाबी घरबसल्या करता येतात. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे च्या माध्यमातून सातबारावर वारसाची नोंद ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करता येते. तसेच ऑनलाईन तुम्ही नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर येथे 18 दिवसाच्या आत त्याची नोंद तुमच्या सातबारावर होते.

 

वारस नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? Varas Nondani Online Arj

जर तुम्हाला सुद्धा तुमच्या सातबारावर वारसाची नोंद करायची असेल तर त्याकरिता तुम्हाला खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

1. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या ई हक्क प्रणालीच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.

2. या https://pdeigr.maharashtra.gov.in वेबसाईट वर जा.

3. आता या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ नावाचा एक पेज दिसेल ते ओपन करायचा आहे.

4. आता तुम्हाला प्रोसेस टू लॉगिन नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं असून त्यानंतर तुम्हाला क्रिएट न्यू यूजर नावावर क्लिक करून स्वतःची संपूर्ण माहिती भरून नवीन अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे.

5. आता तुम्हाला त्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक त्यानंतर तुमचा ईमेल आयडी तसेच पिन कोड तसेच संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे त्यानंतर खाली दिलेल्या कॅप्तचा टाकून सेव करायचा आहे.

6. आता तुमचे ई हक्क प्रणालीच्या वेबसाईटवर नवीन अकाउंट तयार झालेले असून तुम्हाला आता पुढील प्रक्रिया करण्यासाठी या वेबसाईटवर लॉगिन करायचं आहे.

7. आता तुम्हाला फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क या ऑप्शन मध्ये वारस नोंद हा पर्याय निवडयाचा आहे.

8. आता तुम्हाला अर्जदाराची माहिती भरायची आहे. आता तुम्हाला संबंधित खातेदाराचा गट क्रमांक निवडून मृत व्यक्तीचे नाव तसेच खातेदार शोधायचा आहे. तसेच त्या ठिकाणी तुम्हाला मृत व्यक्तीचा मृत्यू दिनांक प्रविष्ट करायचा आहे.

9. आता खातेदार शोधून झाल्यानंतर तसेच वरील माहिती टाकल्यानंतर तुम्हाला अर्जदार हा वारस दारा पैकी एक आहे का असे विचारण्यात येईल, त्यामध्ये योग्य तो पर्याय निवडून घ्या.

10. आता तुम्हाला त्या सातबारावर वारसदार म्हणून ज्या व्यक्तींची नावे लावायची आहे त्यांची माहिती भरा. तसेच त्यांची नावे इंग्रजीत टाका आणि त्यांची जन्मतारीख टाका तसेच त्यांचे वय मोबाईल क्रमांक आणि पिन कोड ते ती माहिती व्यवस्थित भरा.

11. सर्व वारसांची नावे प्रविष्ट केल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

12. ज्याच्या नावावर जमीन आहे म्हणजेच मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला आणि जमिनीची कागदपत्रे व वारसदाराची ओळखपत्र त्याचबरोबर रेशन कार्ड व इतर कागदपत्रे अपलोड करायची आहे.

 

वारस नोंद ऑनलाईन करण्याच्या वेबसाईट वर जा

100 रुपयात जमीन नावावर कशी करायची? कुटुंबाच्या सहमतीने जमीन नावावर करण्याची खात्रीशीर पद्धत

 

त्यानंतर तुमचा वारस नोंदीचा ऑनलाईन अर्ज व्यवस्थितपणे सबमिट केल्यानंतर, अठरा दिवसापर्यंत सातबारा वारसांची नोंद करण्यात येईल.

सन 2023 चा मान्सून अंदाज जाहीर, जाणून घ्या कसा असेल यावर्षी पावसाळा

Leave a Comment