Property Rights: पतीच्या संपत्तीवर पत्नीचा किती अधिकार असतो? संपत्तीत पत्नी ला अधिकार मिळतो का? कसा व केव्हा?

आपण आज एका वेगळ्या व महत्त्वाच्या टॉपिक वर माहिती जाणून घेणार आहोत. लग्न झाल्यानंतर आपल्या पतीच्या संपत्तीवर पत्नीला अधिकार असतो का असेल तर किती अधिकार असतो. कोणत्या परिस्थितीत पत्नीला पतीच्या संपत्ती मध्ये अधिकार मिळतो? कोणत्या परिस्थितीत पत्नीला पतीच्या संपत्तीवर दावा करता येत नाही या Property Rights of wife संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

पतीच्या खालील संपत्तीवर पत्नीला अधिकार मिळतो:-

जर एखाद्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू झालेला असेल तर तिचा तिच्या पतीच्या संपत्तीवर अधिकार असतो. तिच्या पतीची संपत्ती तिला मिळते. परंतु पती जिवंत असताना पत्नीचा पतीच्या कोणत्याही प्रकारच्या संपत्तीवर अधिकार किंवा हक्क नसतो, संपत्ती ही दोन प्रकारची असते पहिली म्हणजे वडिलोपार्जित आणि दुसरी म्हणजे स्वतः कमावलेली. नवऱ्याने कमवलेला संपत्तीवर पत्नीचा तसेच मुलांचा सुद्धा property rights असतो.

 

पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीला मिळणारा अधिकार:

पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीचा व त्याच्या मुलांचा त्याच्या संपत्तीवर अधिकार असतो. जर पतीचे निधन झाले आणि दुसरे लग्न केले तर पोटगी मागता येत नाही. पतीच्या मृत्यूनंतर मुलांचा तसेच पत्नीचा संपत्तीवर समान हक्क असतो.

 

या परिस्थितीत पत्नीला पतीची संपत्ती मिळत नाही:

जर एखाद्या स्त्रीने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतलेला असेल तर त्या स्त्रीला तिच्या पतीच्या कोणत्याही प्रकारच्या संपत्तीवर अधिकार नसतो त्यामुळे तिला पतीची कोणतीही संपत्ती मिळत नाही. जर घटस्फोट घेतल्यानंतर दुसरे लग्न केले तर पहिल्या पतीच्या संपत्तीवर त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा दावा करता येत नाही म्हणजेच तिचा कोणताही हक्क राहत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीला कोणतीही संपत्ती मिळत नाही.

महिलांसाठी महत्वाचं, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना; काय आहे? योजना अर्ज प्रक्रिया

 

जर पतीच्या संपत्तीवर पती आणि पत्नी दोघांचेही नाव असेल तर अशा परिस्थितीत पत्नीला समान प्रमाणात अधिकार मिळतो. जर एखाद्या स्त्री जातीच्या पतीसोबत घटस्फोट झालेला असेल तर तिला तिच्या पतीकडून पोटगी दिल्या जाते, जर त्या पत्नीसोबत तिची मुले असतील तर पोटगी वाढवून सुद्धा मागता येते.

Mofat Mobile Yojana: या महिलांना शासनाकडून मोफत मोबाईल वितरणाचा निर्णय जारी, तुम्हाला मोफत मोबाईल मिळणार का चेक करा

 

त्यामुळे आता तुम्हाला कोणत्या परिस्थितीत पत्नीला तिच्या पतीच्या संपत्तीवर अधिकार असतो तसेच कोणत्या परिस्थितीमध्ये पत्नीला तिच्या पतीची संपत्ती मिळत नाही, या संदर्भातील विस्तृत माहिती तुम्हाला कळलेली असेल या व्यतिरिक्त जर तुम्हाला पती व पत्नीच्या संपत्ती वाटपा Property Rights of wife on Husband Property संदर्भात कोणतेही प्रकारची प्रश्न असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की प्रश्न विचारू शकतात.तसेच पत्नीच्या संपत्ती वाटपाच्या अधिकारा संदर्भातील ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर तुमच्या सर्व मित्रांना देखील नक्की शेअर करा.

Leave a Comment