Pm Kisan: पी एम किसान योजनेचा लाभ आता कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तीला मिळणार? बायकोलाही मिळणार लाभ? जाणून घ्या नियम

शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी योजना म्हणजे पी एम किसान योजना होय. या पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची राशी प्रदान करण्यात येते त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून मिळालेला पैशांचा वापर शेतकरी त्यांचे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तसेच शेती उपयोगी खर्च करिता करू शकतात. ही योजना सुरू केल्यापासून अनेक शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत नोंदणी करून लाभ मिळवलेला असून या pm kisan yojana च्या काही महत्त्वाच्या अटी व शर्ती आहेत ज्या आपण जाणून घेणार आहोत.

 

पी एम किसान योजना काय आहे? What is pm kisan yojana?

देशातील केंद्रीय मोदी सरकारने सुरू केलेली ही एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना pm kisan योजनेच्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर दरवर्षी सहा हजार रुपये राशी मिळते. देशातील कोणत्याही शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळता येतो. शेतकऱ्यांना दरवर्षी निश्चित उत्पन्न मिळवून देणारी ही एक महत्त्वाची kisan yojana योजना आहे.

 

 

पी एम किसान योजना अंतर्गत कुटुंबातील किती सदस्यांना लाभ मिळवता येतो?

पी एम किसान योजनेच्या अंतर्गत कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला लाभ मिळवता येतो. कुटुंबामध्ये प्रामुख्याने पती व पत्नी तसेच अठरा वर्षाच्या खालील मुलांचा समावेश होतो. पी एम किसान योजनेच्या मार्फत एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा नियम असून जर एखाद्या कुटुंबात एकापेक्षा जास्त व्यक्ती अपात्र असून सुद्धा लाभ मिळत असतील तर शासन त्यांच्याकडून मिळालेली रक्कम देखील वसूल करू शकते.

 

बायकोला सुद्धा लाभ मिळेल का?

पी एम किसान योजनेच्या माध्यमातून जर पती व पत्नी दोघेही शेतकरी असले तरीसुद्धा कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळत असल्यामुळे पती किंवा पत्नी यापैकी कोणताही एक सदस्य लाभ मिळवू शकते. जे कुटुंबातील पुरुषांने नोंदणी करून लाभ मिळत असेल तर त्याच्या पत्नीला लाभ मिळणार नाही.

Sinchan Vihir Anudan List: सिंचन विहीर योजना 4 लाख रुपये अनुदानाची यादी जाहीर, आत्ताच आपले नाव यादीत चेक करा

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळत आहे आर्थिक लाभ:

योजनेच्या माध्यमातून देशभरातील आठ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून हे शेतकरी दरवर्षी शासनाकडून 6000 रुपये मिळवत आहे. देशभरात राबवण्यात येणाऱ्या योजनांपैकी ही एक सर्वात मोठी योजना आहे त्यामुळे pm Kisan Yojana अंतर्गत केवळ गरजू व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी शासन वेळोवेळी योजनेमध्ये बदल करत असते.

50000 अनुदान अखेर वाटप सुरू, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात | Niyamit Karj Mafi Anudan

Leave a Comment