50000 अनुदान अखेर वाटप सुरू, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात | Niyamit Karj Mafi Anudan

शेतकरी बांधवांसाठी अतिशय एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करत होते अशा शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन म्हणून वितरित करण्यात येत होते. जवळपास जानेवारी महिन्यापासून तर आत्तापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान योजनेचे वाटप करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आत्तापर्यंत यादीत नाव आलेल्या अनेक शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्सानाची रक्कम मिळालेली नव्हती परंतु आता ही Niyamit Karj Mafi 50000 Anudan रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

 

महाराष्ट्र शासनाने सन 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना संपूर्ण राज्यभरात सुरू केली होती. या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु जे शेतकरी नियमितपणे कर्ज परतफेड करत होते अशा शेतकऱ्यांना शासनाने 50000 प्रोत्साहन रकमेचा लाभ देण्याचे ठरवले होते. त्याच अनुषंगाने जानेवारी 2023 पर्यंत योजनेअंतर्गत पाच याद्या प्रकाशित झालेल्या होत्या आणि या याद्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांचे नाव आलेले होते. परंतु शासनाच्या माध्यमातून 50000 Anudan जमा करण्यात आली नाही.

 

या शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार अनुदान जमा होण्यास सुरुवात:

ज्या शेतकऱ्यांचे नाव 50,000 अनुदान योजनेची यादीत आलेली होती आणि त्या शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती परंतु अद्याप देखील त्यांना पन्नास हजार रकमेचा लाभ मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता रकमेचा लाभ मिळणे सुरू झालेले असून शेतकऱ्यांच्या खात्यात 50000 रक्कम जमा होत आहे.

 

आतापर्यंत पाच याद्या जाहीर Niyamit Karjmafi Anudan:

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आतापर्यंत पाच याद्या जाहीर केलेल्या असून या यादीमध्ये जवळपास लाखो शेतकऱ्यांचा समावेश झालेला असून अद्याप देखील अनेक शेतकरी पात्र आहेत परंतु नवीन यादीचे प्रतीक्षा करीत आहेत. यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नाव आलेले होते अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणे करण्याची प्रक्रिया केल्यानंतर अशा शेतकऱ्यांना 50000 रकमेचा लाभ देण्यात येत आहे.

Gharkul Yojana FTO Check: या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुल योजनेचे पैसे जमा, तुम्हाला मिळाले का? लगेच चेक करा

50 हजार अनुदानाची नवीन यादी येणार का?

शेतकरी बांधवानो नियमित कर्जमाफी 50000 अनुदान योजनेअंतर्गत आतापर्यंत सर्व जिल्ह्यांच्या पाच याद्या प्रकाशित झालेल्या असून पुढील यादी येणार का या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती शासनाकडून प्राप्त झालेली नाही. अनेक शेतकरी अजूनही पात्र आहे परंतु यादीत नाव न आल्यामुळे लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पुढील यादी प्रकाशित करून उर्वरित शेतकऱ्यांना लाभ द्यावा, हीच अपेक्षा.

Cotton Market Price: कापसाने शेतकऱ्यांना यावर्षी रडवले, शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग, अतिशय कमी बाजारभावामुळे शेतकरी चिंतेत

Leave a Comment