महिलांसाठी महत्वाचं, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना; काय आहे? योजना अर्ज प्रक्रिया | Mahila Samman Bachat Yojana

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना केंद्र सरकारने सुरू केलेली खास महिलांसाठी असणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेला सुरू करण्यासाठी केंद्रीय बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली होती. जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ मिळवण्याचे आवाहन ही योजना आता सुरू झालेली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. ही योजना आता संपूर्ण देशभरात सुरू झालेली आहे. आजच्या या लेखात आपण या Mahila Samman Bachat Yojana 2023 अंतर्गत अर्ज कसा करायचा, लाभार्थी पात्रता या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना काय आहे? What is Mahila Samman Bachat Yojana?

मित्रांनो केंद्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाची असणारी महिला सन्मान बचत पत्र योजना असून 2023 च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. योजना संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे, भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ही योजना संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे.

 

या योजनेच्या अंतर्गत सदर महिलेला 1 हजार रुपयापासून ते 2 लाख रुपये पर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे. या महिलांनी केलेल्या गुंतवणूक वर प्रति वर्ष 7.50 टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात व्याज देण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना अतिशय फायदेशीर असणारी ही योजना आहे.

 

महिला सन्मान बचत योजनेचा लाभ कुणाला मिळवता येईल?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या अंतर्गत खालील लाभार्थ्यांना लाभ मिळवता येईल.

1. देशातील मुलीं

2. अज्ञान मुलीं

3. महिला

 

योजने अंतर्गत किती रक्कम मिळेल?

जर या योजनेमध्ये एखाद्या महिलेने 2 लाख रुपये गुंतवणूक केली तर दोन वर्षानंतर योजनेचा मॅच्युरिटी पिरेड झाल्या नंतर त्या महिलेस 2 लाख 32 हजार रुपये इतकी रक्कम मिळेल. त्याचप्रमाणे या योजनेच्या अंतर्गत महिलेने गुंतवणूक केल्यानंतर जर त्या महिलेस योजनेचा पिरेड संपण्यापूर्वी काही रक्कम काढायची असेल तर त्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 

योजनेअंतर्गत कमीत कमी गुंतवणूक किती?

ग्रामीण भागातील गरीब महिलांना, सर्वसामान्य महिला यांना लाभ मिळत यावा तसेच सर्व प्रकारच्या गोरगरीब महिलांना योजनेच्या फायदा व्हावा यासाठी कमीत कमी 1 हजार रुपये इतकी गुंतवणूक करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत समाविष्ट महिलेला कमीत कमी 1000 रुपये गुंतवणूक करून योजनेत सहभागी होता येते.

 

योजनेचा लाभ कसा मिळवायचा? How to Get Benifits of Mahila Samman Bachat Yojana?

जर तुम्हाला या Mahila Samman Bachat Yojana 2023 अंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही भारतीय पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाऊन खातं उघडावं लागेल त्याची प्रक्रिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून तुम्हाला करून देण्यात येईल. देशातील जवळपास 2 लाख 59 हजार इतक्या कार्यालयामध्ये तुम्हाला योजनेअंतर्गत नोंदणी करता येईल.

1 एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली असून 31 मार्च 2025 पर्यंत योजना सुरू आहे. त्यामुळे या दोन वर्षाच्या कालावधीत तुम्ही कधीही योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ शकतात.

 

MSKVY Yojana: आता शेतकऱ्यांना 12 तास वीज, तसेच वार्षिक हेक्टरी 1 लाख 25 हजार भाडे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा शुभारंभ

 

महिलांच्या सक्षमीकरणाकरिता राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी असणारी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना संदर्भात माहिती आपण या लेखात जाणून घेतलेली आहे.

Gay Mhais Watap Yojana: गाय व म्हैस वाटप योजनेला मंजुरी, आता मिळवा 1 लाख 34 हजार अनुदान, असा करा अर्ज

Leave a Comment