शेतकरी मित्रांनो, या सरकारी योजनेत 5 लाख रुपये गुंतवणूक 10 लाख रुपये परत मिळवा, ही आहे प्रोसेस | Kisan Vikas Patr Yojana

मित्रांनो केंद्र शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना सुरू करण्यात आलेले आहे. तसेच शेतकऱ्यांना पैशाची बचत करण्याची सवय व्हावी शेतकऱ्यांकडे असणारा पैसा दुप्पट व्हावा यासाठी देखील केंद्र शासन विविध प्रकारचे योजना राबवित आहे. अशाच प्रकारची महत्त्वाची योजना म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून किसान विकास पत्र योजना (kisan vikas Patra yojana) राबविण्यात येत आहे.

 

या Kisan Vikas Patr Yojana या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. जर एखाद्या शेतकऱ्यांनी पाच लाख रुपये या योजनेमध्ये गुंतवले तर त्याला काही कालांतराने दहा लाख रुपये परत मिळते त्यामुळे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्याकरिता पात्रता व अर्ज प्रक्रिया ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

काय आहे किसान विकास पत्र योजना? What is Kisan Vikas Patra Yojana?

किसान विकास पत्र ही एक केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी तसेच पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने देण्यात येणाऱ्या व्याजदरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली असून आता शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा पाच महिने कमी कालावधीमध्ये त्यांचे पैसे दुप्पट करता येणार आहे. किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गुंतवणूक करून मॅच्युरिटी कालावधीनंतर त्यांचे पैसे दुप्पट करण्याची सुविधा उपलब्ध होते.

 

एवढ्या दिवसात होईल तुमचे पैसे दुप्पट?

या किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून आता केवळ 115 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होणार आहे. पूर्वी या योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असेल तर 120 महिन्याचा कालावधी लागत होता परंतु आता शासनाने व्याजदरामध्ये वाढ केलेली असल्यामुळे पाच महिन्याचा कालावधी कमी झालेला आहे.

 

योजनेअंतर्गत कमीत कमी किती रुपये गुंतवता येते?

योजना सर्वसामान्य व्यक्ती तसेच शेतकरी गोरगरीब व्यक्ती यांच्यासाठी असून योजनेअंतर्गत सर्वांना समाविष्ट होता यावे यासाठी केंद्र शासनाने कमीत कमी 1 हजार रुपये गुंतवणूक करण्याची मर्यादा ठेवलेली आहे.

 

योजनेअंतर्गत कोण कोण लाभ मिळवू शकते?

ही योजना खास करून देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे m कमीत कमी 18 वर्षे वय असणारे कोणतेही शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ मिळवू शकतात. त्याचबरोबर अल्पभूधारक तसेच मध्यम शेतकरी सुद्धा योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पश्चात त्या नॉमिनीला सुद्धा रक्कम मिळते.

 

अर्ज कसा करायचा व लाभ कसा मिळवायचा? How to Apply For Kisan Vikas Patra?

योजनेअंतर्गत तुम्हाला एक हजार रुपये तसेच पाच हजार रुपये किंवा दहा हजार रुपये आणि 50000 रुपयांच्या प्रमाणात किसान विकास पत्र मिळवता येते. किंवा तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार किसान विकास पत्र घेऊ शकतात.

 

योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी तुम्ही तुमच्याजवळ पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किसान विकास पत्र योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात आणि अर्ज करू शकतात.

 

कांदा चाळीच्या अनुदानात वाढ, आता कांदा चाळ योजने अंतर्गत 1 लाख 60 हजार रु अनुदान, असा करा अर्ज

 

आवश्यक कागदपत्रे:

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असायला पाहिजे.

1. आधार कार्ड

2. पॅन कार्ड

3. मतदार ओळखपत्र

4. ड्रायव्हिंग लायसन्स

5. पासपोर्ट

6. किसान विकास पत्र अर्ज

7. पत्ता पुरावा

8. जन्म प्रमाणपत्रKisan Vikas Patr Yojana

वरील कागदपत्र तुम्हाला योजने अंतर्गत सहभागी होऊन लाभ मिळण्यासाठी आवश्यक आहे.

Crop Insurance Update: शेतकऱ्यांना पिक विमा न वाटप करणाऱ्या पिक विमा कंपनीला दणका, कंपनीला टाकले ब्लॅकलिस्ट मध्ये

Leave a Comment

WhatsApp Icon