पेरणीचा हंगाम जवळ येताच शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, रासायनिक खत स्वस्त, दरात मोठ्या प्रमाणात घसरण होणार | Fertilizer Prices 2023

शेतकरी बांधवांना लवकरच खरीप हंगाम 2023-24 सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खते स्वस्त दरात मिळण्याची शक्यता आहे. रासायनिक खतांचे भाव गडगडण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते उपलब्ध झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपल्याकडे आलेला असून त्या Fertilizer Prices 2023-24 संदर्भात विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

शेतकऱ्यांसाठी रासायनिक खत ही एक महत्त्वाची बाब असून प्रत्येक शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत आहे. तसेच देशात रासायनिक खतांच्या किमती(Fertilizer Rates) गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले असून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झाल्यास शेतीवरील खर्च निघणे कठीण होते. उपयोगी तसेच शेती संदर्भातील सर्वच वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असून त्यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे रासायनिक खते सुद्धा होय. बी बियाण्याच्या वाढलेल्या किमती तसेच रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडणं कठीण झालेली आहे.

 

 

रासायनिक खतांच्या व बियाण्यांच्या किमती कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी:

रासायनिक खते तसेच बी बियाणे व औषधे यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीवर येणारा खर्च वाढलेला आहे परंतु खर्च वाढलेला असताना सुद्धा शेतकऱ्यांची उत्पन्न वाढलेली नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य त्या प्रमाणात भाव मिळालेला नाही तर शेतकऱ्यांना शेती करणे अवघड जाईल. त्यामुळे वारंवार शेतकरी वर्गांकडून रासायनिक खते व बी बियाण्यांच्या किमती कमी करण्याची मागणी शासन दरबारी करण्यात येत असते.

2021 पासून 2023 पर्यंत रासायनिक खतांचे किमती जवळपास 60% इतकी वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला मिळणारा भाव किती पटीने वाढला हे समजायचे झाल्यास त्याचा कोणताही ताळमेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य त्या प्रमाणात भाव न मिळणे आणि दरवर्षी रासायनिक खते व बियाणे यांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांची अर्थचक्र बिघडलेले आहे.

 

रासायनिक खतांच्या किमतीत 14 टक्के घट 14 percent reduction in the price of chemical fertilizers

आता टप्प्याटप्प्याने खतांच्या किमतीत घट होताना दिसत आहे, मार्च 2022 डिसेंबर 202 या कालावधीमध्ये रासायनिक खतांच्या किमतीमध्ये घट दिसून आली. तसेच फेब्रुवारी 2023 ते एप्रिल 2023 या कालावधीमध्ये रासायनिक खतांच्या Fertilizer Prices 2023 मध्ये एकूण 14 टक्क्यांची घट झालेली आहे.

 

सर्व रासायनिक खतांच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच देशातील महत्त्वाची असणारी IFFCO या कंपनीने खतांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून झालेल्या कमी किमतीमुळे कंपनीच्या मार्फत देशामध्ये विक्री करण्यात येणाऱ्या खतांच्या किमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे येत्या काळात इतर सर्व कंपन्यांकडून देखील खतांच्या किमतीमध्ये घट करण्यात येण्याची शक्यता आहे.

सध्याच्या खताच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment