Farmer Update: शेतकरी मित्रांनो, यावर्षी पेरणीची घाई करू नका, हवामान खात्याने दिला हा महत्वाचा इशारा, महत्वाची माहिती

शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांसाठी पेरणीचा कालखंड अतिशय महत्त्वाचा असतो. शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन शेतीवर आणि शेतीमधून येणाऱ्या उत्पन्नावर असते. असे म्हटले जाते की पेरणी सक्सेसफुल झाली म्हणजे अर्धे पीक आपल्या घरात आले. त्यामुळे जर तुमची पेरणी सफल झाली तर हा येणारा वर्ष तुमच्यासाठी चांगलं असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी पेरणी करताना कोणतीही घाई गडबड करू नये या संदर्भात महत्त्वाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, त्या Farmer Update संदर्भात महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

यावर्षी हवामान विभागाने महाराष्ट्र राज्यात पावसाळ्याच्या कालावधीत दरवर्षीपेक्षा सरासरी कमी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच महाराष्ट्राच्या काही भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी ठरणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे.

 

यापूर्वी आपण हवामान विभागाने जाहीर केलेले Maharashtra Weather Forecast चे विश्लेषण जाणून घेतले होते. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी पावसाचा एकंदरीत अंदाज घेऊन पेरणी प्रक्रिया करावी.

 

शेतकरी बांधवांना या कारणामुळे पेरणीची घाई करू नका:

यावर्षी एल निनो संकेत आहे त्यामुळे जून ते सप्टेंबर या महिन्यात सरासरी 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात पावसाळ्याच्या कालखंडात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात जून महिन्यामध्ये सर्व शेतकरी पेरणी करत असतात, आणि जून महिन्याच्या कालावधीत राज्याच्या अनेक भागांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे एखादं पाणी आल्यानंतर म्हणजेच एखाद्या दिवसाचे पावसाचे हजेरी झाली तर तुम्ही लगेच पेरणी करू नका. हवामान विभागाच्या सल्ल्यानुसार जेवढा पाऊस आवश्यक असतो तेवढा पाऊस पडू द्या नंतरच पेरणी करा.

Mofat Jamin Watap Yojana: या भूमिहीन व शेतमजुरांना जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान, असा करा अर्ज

या भागात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस Maharashtra Weather Forecast 2023:

भारतीय हवामान विभागाने या वर्षाच्या हवामानाचा अंदाज वर्तवलेल्या असून हवामान अंदाजानुसार विदर्भाच्या काही भागात तसेच मराठवाड्याच्या बहुतांश भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस असणार आहे. तसेच कोकण विभागात सरासरी इतका पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर उत्तर कोकणाच्या काही भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असून पेरणी करण्याची घाई करू नये एक-दोन दिवसाच्या पावसा नंतर पेरणी लगेच करू नये.

 

यावर्षी मानसून वर एल निनो चे संकट:

यावर्षी पावसाळ्याच्या कालखंडात प्रशांत महासागरामध्ये जास्त तापमान राहणार असल्याचा अंदाज आहे. यावर्षी एल निनो चा प्रादुर्भाव mansoon वर राहणार आहे. त्यामुळे याचा फटका राज्यातील पावसावर होऊ शकतो.

Gharkul Yojana FTO Check: या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुल योजनेचे पैसे जमा, तुम्हाला मिळाले का? लगेच चेक करा

Leave a Comment