20,601 रिक्त पदांसाठी अंगणवाडी भरती पुन्हा सुरू, कोर्टाची स्थगिती मागे | Anganwadi Bharti 2023 Maharashtra

महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेली 20 हजार 601 रिक्त जागांची अंगणवाडी भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या अंगणवाडीत भरती प्रक्रिया कोर्टाने दिलेली स्थगिती तात्पुरती उठवण्यात आलेली असून आता अंगणवाडी भरती राबविण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आजच्या या लेखात आपण Anganwadi Bharti 2023 संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत.

 

खालील पदांकरिता अंगणवाडी भरती सुरू Anganwadi Bharti Maharashtra:

महाराष्ट्र शासनाने एकूण 20601 रिक्त जागांची करीता राज्यात अंगणवाडी विभागांची भरती सुरू करण्यात आलेली होती. अंगणवाडी भरती 2023 मध्ये खालील पदांचा समावेश आहे.

1. अंगणवाडी सेविका

2. अंगणवाडी मदतनीस

3. मिनी अंगणवाडी सेविका

 

वरील तीन महत्त्वाच्या पदांकरिता अंगणवाडीमध्ये भरती सुरू करण्यात आलेली होती, परंतु कोर्टाच्या माध्यमातून या भरतीवर स्थगिती आणण्यात आली होती, परंतु ती आता उठवण्यात आलेली आहे.

 

पदांचे नाव व रिक्त जागा

1. अंगणवाडी सेविका- 4509

2. अंगणवाडी मदतनीस- 15466

3. मिनी अंगणवाडी सेविका- 626

 

अंगणवाडी भरती शासन निर्णय:

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने वरील 3 पदांच्या एकूण 20 हजार 601 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राज्यात राबवण्यासाठी मंजुरी दिलेली होती. त्या Anganwadi Recruitment Maharashtra संदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या बालविकास विभागाने डिसेंबर 2022 मध्ये महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करून ही भरती प्रक्रिया 31 मे 2023 पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते तसेच सूचना दिल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने 12 फेब्रुवारी 2023 रोजी एक शासन निर्णय जाहीर करून वयाची अट तसेच इतर सर्व अटी व शर्ती पात्रता नमूद केलेल्या होत्या. त्यानंतर ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्यात सुरू झालेली होती.

परंतु या Anganwadi Bharti Maharashtra प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये तसेच इतर काही बाबींमध्ये झालेल्या बदलामुळे त्या संदर्भातील याचिका कोर्टामध्ये टाकण्यात आलेली होती, त्यामुळे या अंगणवाडी भरतीला कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली होती ती आता उठवण्यात आलेली असून अंगणवाडी भरती चा मार्ग मोकळा झालेला आहे.

Mumbai High Court Recruitment: मुंबई उच्च न्यायालय नोकरी हवी आहे? 4 थी पास उमेदवारांनो मिळवा तब्बल 52 हजार रुपये पगार,उच्च न्यायालयात या पदाकरिता भरती

 

अर्ज कसा करायचा? How to Apply for Anganwadi Bharti Maharashtra?

राज्य शासनाच्या मार्फत अंगणवाडी भरतीला मिळालेली मंजुरी तसेच कोर्टाने हटवलेली स्थगिती यामुळे आता लवकरच विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी भरतीचे अर्ज सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झाल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यापूर्वी आपण अनेक जिल्ह्यांकरिता अर्ज सुरू झाल्यानंतर माहिती दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी भरतीची प्रक्रिया सुरू होणारा असून अर्ज सुरू झाल्यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येईल.

 

शेअर बाजार समजण्याकरिता महत्वपूर्ण पुस्तक मराठी

Leave a Comment