100 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजनेचे अर्ज सुरू; असा करा अर्ज, ही आहे पात्रता | Sheli Gat Vatap Yojana Maharashtra

100 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजनेचे अर्ज सुरू; असा करा अर्ज, ही आहे पात्रता | Sheli Gat Vatap Yojana Maharashtraशेतकरी बांधवांनो राज्यात विविध घटकांकरिता वेळोवेळी विविध प्रकारच्या योजना राबवून लाभ देण्यात येत असतो. शेळीपालनाची योजना या राज्य शासनाच्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत तसेच महामेष अंतर्गत किंवा राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत तसेच नाविन्यपूर्ण घटकांतर्गत राबविण्यात येतात. सध्या महाराष्ट्र शासनाच्या एका जिल्ह्याकरिता शेळी गट वाटप योजना अंतर्गत अर्ज सुरू झालेली असून कोणत्या अर्जदारांना अर्ज करता येणार आहे त्याकरिता पात्रता या Sheli Gat Vatap Yojana संदर्भातील माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

 

शेळी गट वाटप योजना कोणत्या जिल्ह्याकरिता आहे?

राज्यातील जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत ही योजना राबविण्यात येत असून धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग तसेच विधवा महिलांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती किंवा विधवा महिला असाल तर शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणाऱ्या Sheli Gat Vatap Yojana 2023 Maharashtra अंतर्गत अर्ज करू शकतात.

 

शेळी गट वाटप योजना अंतर्गत किती लाभ मिळेल? Sheli Gat Yojana Maharashtra?

धाराशिव जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे या शेळी गट वाटप योजना अंतर्गत 2 शेळ्यांच्या गटाचे वाटप करण्यात येणार असून 100 टक्के अनुदानावर हे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये शेळ्यांची किंमत 16 हजार रुपये तर तसेच तीन वर्षाचा विमा 1012 रुपये अश्या प्रकारे 17 हजार 12 रुपये शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार आहे.

 

शेळी गट वाटप योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा?

धाराशिव जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या शेळी गट वाटप योजना अंतर्गत संबंधित पात्र लाभार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज करावा लागेल. विहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थितपणे भरून त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून अर्ज जमा करायचा आहे.

Garpit Nuksan Maharashtra: गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; 177 कोटी मंजूर, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला

 

शेळी गट वाटप योजना अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख

शेळी गट वाटप योजना अंतर्गत संबंधित पात्र अर्जदारांना विहित नमुन्यातील त्यांचा ऑफलाइन अर्ज 3 मे 2023 पूर्वी पंचायत समिती किंवा पशुसंवर्धन विभागांमध्ये जमा करायचं आहे.

 

शेळी गट वाटप अर्ज पहा

शेळी गट वाटप अर्ज पहा

Leave a Comment