राज्यात ‘शासकीय योजनांची जत्रा’ राबविण्यात येणार शासन निर्णय आला, एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ, महत्त्वाचा निर्णय | Shaskiya Yojnanchi Jatra

शेतकरी बांधवांनो राज्याच्या सर्वच भागात शासकीय योजनांची जत्रा राबविण्यात येणार असून त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर शासकीय योजनांची जत्रा राबविण्यात आलेली होती त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आता राज्यातील सर्वच भागात शासकीय योजनांची जत्रा राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असून ही शासकीय योजनांची जत्रा उपक्रम काय आहे या Shaskiy Yojnanchi Jatra संदर्भात माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

 

राज्य तसेच केंद्र शासन वेळोवेळी लोकांचे हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असते. परंतु समाजातील गरीब व दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या योजना या त्या घटकापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे ज्या घटकाला ज्या योजनेचा लाभ मिळवणे अपेक्षित आहे त्या घटकाला त्या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून राज्य शासन शासकीय Jatra Shaskiya Yojanachi हा उपक्रम राज्यात राबवित आहे.

 

 

काय आहे ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रम what is Jatra Shaskiya Yojanachi?

राज्यातील प्रत्येक गरजू व पात्र असणाऱ्या व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा तसेच कुणीही लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्यात शासकीय योजनांची जत्रा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्या घटकांना विविध योजनांचा लाभ मिळवणे अपेक्षित होते परंतु अद्याप देखील त्यांना लाभ मिळालेला नाही, अशा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या Shaskiya Yojnanchi Jatra 2023 संदर्भातील सूचना देण्यात आलेल्या असून शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे.

 

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची योजने संदर्भातील कामे जलद गतीने तसेच कमी कागदपत्रांमध्ये तसेच निर्धारित शुल्कात होणार असून विविध योजना शेतकऱ्यांना एकाच छताखाली उपलब्ध होतील. Jatra Shaskiya Yojanachi अंतर्गत तीन दिवस सर्व विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी एकाच ठिकाणी राहणार असून योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी तसेच गरजू व्यक्तींना मिळवून देणार आहे.

 

या शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना योजनांची माहिती सांगणे तसेच कागदपत्रांची माहिती सांगणे त्याचबरोबर लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती पावले उचलणे. इत्यादी बाबी करण्यात येणार आहे. तसेच Shaskiya Yojnanchi Jatra मार्फत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.

 

शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा थेट अधिकाऱ्यांशी संवाद होणार असून जनतेच्या समस्या तसेच योजनांची लाभ मिळण्यासाठी असणारी अडचण शासन दरबारी पोहोचणार आहे.

 

बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची? मिळेल विविध 32 योजनांचा लाभ; ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू

 

‘जत्रा शासकीय योजनांची’ उपक्रम कुठे राबविण्यात येणार?

Shaskiya Yojnanchi Jatra हा उपक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार असून किमान एका जिल्ह्यातून 75 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवलेला आहे. 15 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या दोन महिन्याच्या महत्त्वाच्या कालावधीत राज्यातील सर्वच भागात एक प्रकारे शासकीय योजनांचे प्रदर्शन भरून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवून लाभ देण्यात येणार आहे.

 

Ativrushti Nuksan Bharpai: या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अतिवृष्टी अनुदानाचे 150 कोटी रुपये; 69720 शेतकरी पात्र 

Leave a Comment

WhatsApp Icon